'ग्रामपंचायतीमध्ये सॅनिटरी नॅपकिन मोफत द्यावे'

Image may contain: 13 people, people smiling, people standing
शिरूर, ता.१२ मार्च २०१८ (प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यातील ९३ ग्रामपंचायतीमध्ये सॅनिटरी नॅपकिन मोफत देण्याबाबत सुचना कराव्यात  अशी मागणी शिरुर शहरातील महिला संघटनांच्यावतीने शिरुर पंचायत समितीकडे करण्यात आली.
मासिक पाळीच्या काळात ग्रामीण भागातील महिलांमध्ये  हवी ती जागृती नसते. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सॅनिटरी नॅपकिन वापराबाबत ग्रामीण भागातील महिलांमध्ये वापराबाबत आर्थिक दुर्बलतेमुळे याचा वापर करु शकत नाहीत.

या सर्व बाबींचा विचार करुन ग्रामपंचायतींच्या १४ व्या वित्त आयोगातुन सॅनिटरी नॅपकिन देता येउ शकते.याबाबत शिरुर पंचायत समिती ने शिरुर तालुक्यातील ९३ ग्रामपंचायतींना सुचना द्याव्या अशी मागणी शिरुर शहरातील महिला संघटनांच्या वतीने करण्यात आली.

या मागणीचे निवेदन शिरुर पंचायत समितीच्या उपसभापती मोनिका हरगुडे यांना देण्यात आले.यावेळी जि.प.सदस्या कुसुमताई मांढरे, अॅक्टिव्ह सोशल ग्रुप च्या कामिनी बाफना, आदिशक्ती महिला मंडळाच्या शशिकला काळे, युवा स्पंदनच्या प्रियंका धोञे,जिजाऊ ब्रिगेडच्या मंजुश्री थोरात, रामलिंग महिला उन्नती संस्थेच्या राणी कर्डिले, रुपाली बोरा, प्रिती बोरा, अपर्णा शहा, राणी बोथरा आदी उपस्थित होते. 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या