'मूल्यवर्धन प्रेरक'पूरस्काराने सुरेखा पवार सन्मानित

Image may contain: 14 people, people smiling, people on stage
अण्णापूर, ता. १३ मार्च २०१८ (ज्ञानेश पवार) :
अण्णापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका सुरेखा पवार यांना सन २०१७-१८च्या 'मूल्यवर्धन प्रेरक' पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. 

शालेय पातळीवर विदयार्थ्यांमध्ये संविधानात्मक मूल्ये रुजविण्यासाठी शांतीलाल मुथ्था फाउंडेशन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने या वर्षापासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सर्व शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यात येत आहे .त्यामध्ये विद्यार्थी व इतर शिक्षक यांना प्रोत्साहीत करण्याची जबाबदारी स्विकारून त्या संदर्भातील सक्रीय योगदानाबद्द्ल अण्णापूर ( ता. शिरूर ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी प्रिय उपक्रमशील शिक्षिका सौ.सुरेखा पवार यांना सन २०१७-१८च्या 'मूल्यवर्धन प्रेरक ' पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. शांतीलाल मुथ्था फाऊंडशेनचे संस्थापक शांतीलाल मुथ्या व विद्या प्राधिकरण पुणे चे संचालक डॉ.सुनिल मगर यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र प्रशासनाच्या वतीने  मलठण केंद्राचे केंद्रप्रमुख रामदास बोरुडे यांनी त्यांना प्रदान केले.

याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक,विदयार्थी व पालक उपस्थित होते. सुरेखा पवार यांचा शिष्यवृत्ती मार्गदर्शनात हातखंडा असून अण्णापूर शाळेचे एका वर्षात सर्वात जास्त १७ विदयार्थी गुणवत्ता यादीत येण्याची कामगिरीही त्यांनी केली आहे. एक दिवस वर्गासाठी, वर्ल्ड ऑफ इंग्लिश वर्ड, ओपन डे, वाढदिवसाचे अभिनव कॅलेंडर आदी नाविन्यपुर्ण उपक्रम त्यांनी अण्णापूर शाळेत राबविले आहेत.

विविध वृत्तपत्रांमध्येही त्यांनी लेखन केले आहे. शिक्षक प्रशिक्षणात मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. पुणे जिल्हा परिषद,शिरुर पंचायत समिती तसेच विविध संस्था व संघटनांचे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.  सुरेखा पवार यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल शिरुर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे, पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे, माजी उपसभापती वाल्मिकराव कुरंदळे, माजी सदस्य दादा पाटील घावटे, नगरसेवक विठ्ठल पवार,कारभारी झंजाड,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अंकुश पवार, उपाध्यक्ष रामदास शेळके व अनेक पालकांनी  त्यांचे अभिनंदन केले.

या सन्मानामुळे  विदयार्थ्यांकरीता अधिक काम करण्याची प्रेरणा व पाठबळ मिळाल्याची भावना सुरेखा पवार  यांनी सत्कारानंतर बोलताना व्यक्त केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या