गठई कामगारांना पीच स्टॉल परवाना द्या: विजेंद्र गद्रे

Image may contain: 7 people, indoor
शिरुर,ता.१५ मार्च २०१८(प्रतिनीधी) :
शिरुर शहरातील गठई कामगारांना पीच स्टॉल परवाना मिळावा अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष विजेंद्र सुभाष गद्रे यांनी शिरुर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे कि, शिरुर शहरात सुमारे २०  गठई कामगार असुन हे व्यावसायिक रस्त्याच्या कडेला बसुन उन,वारा,पाउस सहन करुन आपली सेवा देतात.नगरपरिषदेच्या हद्दीत गठई कामगारांना बैठे व स्टॉल परवाना देणेबाबत महाराष्ट्र शासनाने २००० साली आदेश दिला आहे.तसेच रस्त्याच्या जागेत अथवा चौकात पीच परवाने देण्याची तरतुद केली आहे.माञ शासनाचा आदेश असुनही नगरपरिषद हद्दीतील चर्मकार गठई कामगार यापासुन वंचित राहत आहे.

तरी या आदेशाची अंमलबजावणी करुन शिरुर नगरपरिद हद्दीतील गठई कामगारांना पीच व स्टॉल परवाने द्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली.या मागण्यांचे निवेदन शिरुर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांच्याकडे देण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष विजेंद्र गद्रे, राज्यकार्यकारीणी सदस्य विलास पोटे, शिरुर शहराध्यक्ष तुषार अडसुळ,पोपट शेलार, तुषार वेताळ, गोपीचंद कदम, योगेश दळवी, विशाल पोटे, सुनिल साळी, प्रशांत फुलफगर, रमेश जगताप, संतोष पाखरे आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या