विद्यादेवी पोळ यांच्या 'जगणं कळतं तेव्हा' चं प्रकाशन

Image may contain: 12 people, people smiling, people standing and indoor
शिरुर, ता.१५ मार्च २०१८(प्रतिनीधी) :
शिरुर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी लिहिलेल्या 'जगणं कळतं तेव्हा' या पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच करण्यात आलं.

शिरुर नगरपालिकेच्या सभागृहात  पार पडलेल्या या पुस्तकाचे राजहंस प्रकाशन चे प्रमुख दिलीप माजगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी या पुस्तकाच्या संपादक वंदना बोकिल कुलकर्णी, डॉ.चंद्रशेखर बर्वे,मुख्य लिपिक आयुब सय्यद,नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.जगणं कळतं तेव्हा या पुस्तकात एका मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा असुन विवाह संस्था, कुटुंबसंस्था आणि समाजाशी असलेली सांधेजोड याचे विवेचन लेखिकेने केले असल्याचे संपादक बोकिल यांनी सांगितले.कुटुंबातील घडणा-या घटना,घडामोडी याबाबत मुलांचे स्वत:चे वेगळे विचार यानिमित्ताने या पुस्तकात अधोरेखित केले असल्याचे राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर यांनी सांगितले.

या पहिल्याच पुस्तकाबाबत मुख्याधिकारी पोळ यांनी बोलताना सांगितले कि,हा जीवनातील आनंदाचा क्षण असुन  लेखनाची सुरुवातीपासुनच आवड असुन स्वत:चे ललित लेख या पुर्वी प्रसिद्ध झाले आहेत.कामाच्या धबडग्यात लेखन मागे पडत चालले असताना या पुस्तकाने पुन्हा लिहिण्यासाठी स्फुर्ती व नवी उर्जा मिळाली असल्याचे बोलताना सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या