पक्ष्यांनो या..पाणी प्या..भुर्रर्र उडुन जा

विठ्ठलवाडी,ता.१६ मार्च २०१८(प्रा.एन.बी.मुल्ला) :  येथील पांडूरंग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कल्पकतेने पक्षासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे.त्यामुळे उन्हाळयात पक्ष्यांची तहान भागण्यासाठी या पाण्यामुळे मदत झाली आहे.   सध्या उन्हाची तिव्रता वाढत आहे.रणरणत्या उन्हामुळे अंगाची काहीली होत असतानाच सर्वत्र जलस्त्रोत आटल्याचे विदारक दॄष्य असून पाण्याची टंचार्इ निर्माण झाली आहे.वाढत्या तापमानामुळे पाण्याअभावी कित्येक पक्ष्यांचा मॄत्यू होतो.या गोष्टीचा विठ्ठलवाडी येथील विद्यार्थी व शिक्षकांनी गांभीर्याने विचार करून त्यांनी पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.
विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम नजन व विद्यालयातील सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्याथ्र्यांकडून टाकावू प्लॅस्टिक कॅन व डबे यांच्यापासून मोठया कल्पकतेने हे डबे कापून त्यांना आकर्षक असा आकार दिला आहे.यामध्ये पाणी तळाशी साठून राहून ते पक्ष्यांना पिण्यासाठी उपलब्ध होर्इल तसेच पक्ष्यांना त्यावर बसून आरामदायकरित्या पाणी पिता येर्इल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

सुमारे 20 कॅन आतापर्यंत सातवीच्या विद्यार्थ्यांनी बनविलेले असून अन्य वर्गातील विद्यार्थी देखील हा प्रकल्प बनविण्यासाठी उत्सूक असल्याने ही संख्या वाढवून 100 वर नेणार असल्याचे तसेच पक्ष्यांसाठी धान्याची व्यवस्था करणार असल्याचेही यावेळी बोलताना ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब गायकवाड यांनी सांगीतले.अधून मधून पाणी बदलण्याची व्यवस्थाही विद्याथ्र्यांनी गटाद्वारे वाटून घेतली आहे.विद्याथ्र्यांच्या या अभिनव उपक्रमाचे परीसरात कौतुक होत असून परीसरात पक्ष्यांचा किलबिलाटही वाढला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या