हवेत राहून नको..जमीनीवर राहून आंदोलनं करा...

Image may contain: one or more people, people sitting and crowd
शिरुर,ता.१७ मार्च २०१८(प्रतिनीधी) :
शिरुर येथील राष्ट्रवादीच्या बैठकित पुन्हा एकदा शिरुर-आंबेगाव असा वाद असल्याचं पहावयास मिळालं.

शिरुर येथील बाजारसमितीच्या सभागृहात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिरुर तालुका,शहर कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.या बैठकिस पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासनाना देवकाते, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे, माजी आमदार अशोक पवार, पोपटराव गावडे, सुर्यकांत पलांडे आदी उपस्थित होते.

या वेळी बैठकित माजी आमदार सुर्यकांत पलांडे यांनी स्पष्टपणे बोलताना सांगितले कि, पुर्वी पवार साहेब यांना माणणारे कार्यकर्ते होते.अलिकडच्या काही काळात त्या-त्या भागातील नेत्यांना मानणारा कार्यकर्त्यांचा वर्ग असला तरी शिरुर-आंबेगाव मध्ये वारंवार दिसणा-या 'सुभेदा-या' या घातक असल्याचे नमुद केले.त्याचप्रमाणे हवेत राहुन आंदोलनं न करता जमीनीवर राहुन आंदोलनं करायला पाहिजे, सर्वांनी एकञितपणे आंदोलनात सहभागी झालं पाहिजे अशा भावना व्यक्त केल्या.

यावेळी तालुकाध्यक्ष रवि काळे म्हणाले कि,तालुकाध्यक्ष झाल्यानंतर आजपर्यंत प्रामाणिक काम करत आलो आहे.शिरुर आंबेगाव असा भेदभाव कधीच केला नाही.आजपर्यंत नेत्यांचीच मर्जी सांभाळली असल्याचे काळे म्हणाले.

तर जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी कार्यकर्त्यांनी अंतर्गत कुरबुरींना फाटा दिला पाहिजे असे बैठकित सुचविले.याच  प्रश्नावर जालिंदर कामठे यांनी माञ जास्त बोलणं टाळले.

शिरुर बाजारसमितीत पार पडलेल्या हल्लाबोल आंदोलनाच्या पुर्व तयारीच्या बैठकित पक्षश्रेष्ठींसमोर शिरुर-आंबेगाव असा भेदभाव असल्याचे यानिमित्ताने पहावयास मिळाले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या