शिरूरकर आगामी निवडणूकीत देणार राष्ट्रवादीला पाठिंबा

No automatic alt text available.
शिरूर
, ता. 19 मार्च 2018 :
शिरूरकर आगामी निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणार आहेत, असा कौल नेटिझन्सनी www.shirurtaluka.comवर दिला आहे.

शिरूर तालुक्यात आघाडीवर असलेल्या www.shirurtaluka.com या संकेतस्थळाने 12 ते 18 मार्च या कालावधीमध्ये मतचाचणी घेतली होती. यावेळी नेटिझन्सनी आपले मत नोंदविताना राष्ट्रवादीच्या बाजूने कौल दिला आहे.

मतचाचणी पुढीलप्रमाणेः
आगामी निवडणूकीत कोणत्या पक्षाला आपण पाठिंबा द्याल ?
1) भाजप- 30 टक्के
2) राष्ट्रवादी- 52 टक्के
3) कॉंग्रेस- 4 टक्के
4) शिवसेना- 9 टक्के
5) अन्य- 4 टक्के


देशात व राज्यात सध्या भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारवर नागरिकांची नाजारी दिसून येत आहे. सध्या शिरूर-हवेलीचे भाजपचे बाबूराव पाचर्णे तर आंबेगाव-शिरूरचे राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील हे आमदार आहेत. शिरूर तालुक्यात सध्या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागिरक अक्षरशः हैराण झाले आहेत. विविध प्रश्न ऐरणीवर आहेत. यामुळे या प्रश्नांकडे आजी आमदारांना लक्ष देण्याची वेळ आली आहे. अन्यथा नेटिझन्स बदल घडविल्याशिवाय राहणार नाहीत.

शिरूरकरांनी सध्याच्या परिस्थितीवरून तरी राष्ट्रवादी पक्षाला पाठिंबा दिला असला तरी आगामी निवडणूकीत कोणत्या पक्षाला पाठिंबा मिळेल हे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या