शिरूर तालुका माध्यमिक शिक्षक संघाची कार्यकारिणी जाहिर

तळेगाव ढमढेरे,ता.१९ मार्च २०१८(प्रा.एन.बी.मुल्ला) : शिरूर तालुका माध्यमिक शिक्षक संघाची वार्षिक सर्वसाधरण सभा नुकतीच संपन्न झाली.या सभेत तालुक्याची नुतन कार्यकारीणी बिनविरोध निवडण्यात आली.

सभेच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष के.एस.ढोमसे होते तर निवडणूक निरीक्षक म्हणून उपाध्यक्ष दादासाहेब गवारे उपस्थित होते.नुतन कार्यकारीणी पुढीलप्रमाणे :– अध्यक्ष : अशोक दरेकर(माध्य.व उच्च माध्य.विद्यालय सणसवाडी), उपाध्यक्ष : बाळासाहेब गायकवाड(श्री पांडूरंग विद्यामंदिर विठ्ठलवाडी), गणेश मांढरे(विद्याधाम प्रशाला शिक्रापूर).कार्यवाह : संदीप सरोदे(अभिनव विद्यालय सरदवाडी), जिल्हा प्रतिनिधी : दादासाहेब गवारे(सद्गुरूकॄपा विद्यालय नागरगाव), धर्मेंद्र देशमुख(महर्षी शिंदे हायस्कूल आंबळे), बाळासाहेब कुलट(तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालय निर्वी),सहकार्यवाह : गोपिनाथ शेटे(गुरूनाथ विद्यालय वडनेर), चांगदेव होलगुंडे(न्यू इंग्लिश स्कूल इनामगाव),कोषाध्यक्ष : राजेंद्र मोरे(जीवन विकास मंदिर शिरूर),आयव्यय निरीक्षक : नवनाथ धुमाळ(बापूसाहेब गावडे विद्यालय टाकळी हाजी), संजय चव्हाण(संतराज महाराज विद्यालय रांजणगाव सांडस),महिला प्रतिनिधी : शारदा मिसाळ(न्यू इंग्लिश स्कूल इनामगाव), नसीमा काझी(सौ.हिराबार्इ गोपाळराव गायकवाड विद्यालय कासारी), विमल झावरे(डी.एन.ताठे विद्यालय कारेगाव),संघटक : संतोष खताळ(प्रगती हायस्कूल मुखर्इ), योगेश दुसाने(गुरूदत्त विद्यालय सविंदणे), मनोज दिवार(कै.रामराव गेणुजी पलांडे माध्य.आश्रमशाळा मुखर्इ), ज्ञानेश्वर निचित(बापूसाहेब गावडे विद्यालय टाकळी हाजी), रमेश घावटे(विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगी),सल्लागार : इंद्रभान कळमकर(माजी प्राचार्य,भैरवनाथ विद्यालय करडे), चंद्रशेखर औटी(प्राचार्य,गुरूदत्त विद्यालय सविंदणे), स्वाती थोरात(पांडूरंगआण्णा थोरात विद्यालय, आमदाबाद).

यावेळी नरेश्वर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रंगनाथ हरगुडे, डॉ.शिरीष पिंगळे, कुंडलीक कोकडे, संभाजी ठुबे तसेच तालुक्यातील माध्यमिक शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.सर्व नवनिर्वाचित पदाधिका-यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक दरेकर यांनी केले.धर्मेंद्र देशमुख यांनी सुत्रसंचालन केले तर शारदा मिसाळ यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या