अण्णापूर-रामलिंग रोडवर 'द बर्निंग कार' चा थरार


अण्णापूर, ता.१९ मार्च २०१८ (ज्ञानेश पवार):
रामलिंग(ता.शिरुर) रस्त्यावर स्विफ्ट गाडीने अचानक पेट घेतल्याने द बर्निंग कार चा थरार नागरिकांनी अनुभवला. 

कान्हुर मेसाई येथे  कार्यरत असणारे प्राथमिक  शिक्षक संतोष सखाराम दंडवते हे स्वतःच्या  स्विफ्ट गाडीने शिरुरवरुन जात असताना रासकरवस्तीजवळ गाडीतुन अचानक धुर येवु लागल्यामुळे  ते ताबडतोब  गाडीतून  खाली उतरले  तेवढयात  आगीच्या ज्वाला निघाल्यावर जवळच्या घरातुन त्यांनी पाणी आणुन आग विझविण्याचा प्रयत्न  केला परंतु  आगीने रौद्ररुप धारण केल्याने त्यांचा प्रयत्न  असफल झाला. जवळच्या  विटभट्टीवरुन पाणी आणण्याचा  प्रयत्न नागरिकांनी केला परंतु  विजेअभावी तोही असफल झाला.

यावेळी रस्त्यावर  वहातुक कोंडी झाली होती. टायर फुटल्याचे आवाज दुरपर्यंत ऐकु येत होते.शिरुर  नगरपरिषदेच्या  अग्निशमन यंत्रनेशी संपर्क  होवु न शकल्याने व आग विझविता न आल्याने गाडी संपुर्ण जळुन खाक झाली. उन्हाळ्यात  गाडी चालविताना नागरीकांनी काळजी घेणे महत्वाचे असुन  वेळीच गाडीची सर्व्हिंसिंग करुन घेतल्यास अशा घटनांना आळा बसु शकतो.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या