करडे घाटात कच-यामुळे अपघाताची शक्यता (Video)

शिरुर, ता.२० मार्च २०१८ (प्रतिनीधी) : शिरुर चौफुला मार्गावर करडे घाटात हॉटेल व्यावसायिकांकडुन कचरा फेकुन दिला जात असुन राञीच्या वेळेस जाळला जात असल्याने अपघात घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.शिरुर-करडे रस्ता सतत वर्दळीचा म्हणुन पाहिला जातो.या रस्त्याने प्रामुख्याने रांजणगाव औद्योगिक वसाहत व नगर महामार्गाला जाणारी त्याचप्रमाणे चौफुला,बारामती व साता-याकडे जाणारी वाहनांची सतत ये-जा असते.करडे घाटात हॉटेल व्यावसायिक कचरा टाकतात.यामुळे दुर्गंधी वाढत असुन पर्यावरणाला धोका पोहोचत आहे.

गेल्या काहि दिवसांपासुन हा कचरा पेटविला जात असुन या धुरामुळे अनेकदा राञीच्या सुमारास समोरुन येणारे वाहन दिसत नाही.यामुळे घाटात अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. या धुरामुळे अनेकांना मोठ्या ञासाला सामोरे जावे लागते.वाहनचालकांनी या ठिकाणी कचरा पर्यवारणास हाणी पोहोचविणारा कचरा पेटविणा-यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.तर अनेक नागरिकांनी या ठिकाणी कचरा फेकणा-या हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई करावी, अपघात झाल्यास जबाबदार कोण असा सवाल व्यक्त केला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या