डॉ. राजुरकर यांचे रुग्णसेवेचे कार्य स्तुत्य: सिंधुताई सपकाळ (Video)

शिरुर,ता.२० मार्च २०१८(प्रतिनीधी) : डॉ.अखिलेश राजुरकर यांनी रुग्णांनाच देव मानुन केलेले कार्य स्तुत्य असल्याचे प्रतिपादन अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांनी केले.

शिरुर येथे श्री गणेशा या हॉस्पिटलचे उद्घाटन सिंधुताई सपकाळ, शिरुर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.यावेळी अनाथांची माय सिंधुताई सपकाळ या बोलत होत्या.


या प्रसंगी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी बोलताना शिरुर सारख्या ठिकाणी अद्ययावत रुग्णालय उभारल्यामुळे गरीब रुग्णांना चांगल्या दर्जाचे उपचार मिळणार असल्याचे सांगत डॉ.राजुरकर,डॉ.विशाल महाजन,डॉ.विजयआनंद लोखंडे यांचे कौतुक केले व  येथील रुग्णालयाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

...तो प्रसंग सांगताना अश्रु अनावर
मांडवगण फराटा येथील फराटे कुटुंबातील एका सदस्याचे अचानक छातीत दुखु लागले.यावेळी दवाखान्यात येत असताना दवाखान्याच्या प्रवेशद्वाराजवळच ह्रदय बंद पडले.यावेळी रुग्ण वाचवण्यासाठी सुमारे अर्धातास अथक मेहनत घेतल्यानंतर ह्रदयाचे ठोके सुरु झाले.यानंतर त्यांना तातडीने उपचार केल्यामुळेच प्राण वाचल्याचे सांगत असताना डॉ.अखिलेश राजुरकर यांना अश्रु अनावर झाले.

या कार्यक्रमाला माजी आमदार पोपटराव गावडे,शिरुर च्या नगराध्यक्षा वैशाली वाखारे,तर्डोबाची वाडीच्या सरपंच वर्षा काळे,शिरुर ग्रामीण च्या सरपंच ताराबाई चाबुकस्वार,उपसरपंच विठ्ठल घावटे,माजी उपसरपंच संजय शिंदे, घोडगंगेचे माजी उपाध्यक्ष दादापाटील फराटे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवि काळे, घोडगंगेचे संचालक सुधीर फराटे,दत्ताञय फराटे,राजीव फराटे, मांडवगण च्या माजी सरपंच सिमाताई फराटे, खरेदीविक्रीचे संचालक संतोष मोरे, आबासाहेब सोनवणे व सर्व क्षेञातील मान्यवर उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या