शिरूरमध्ये तिष्ण हत्याराने वार करुन खून (Video)

Image may contain: 1 person, closeup
शिरुर, ता. 22 मार्च 2018:
उसने पैशाच्या वादावरुन शिरुर शहरात गर्दीच्या ठिकाणी एकावर तिष्ण हत्याराने वार करुन खून करण्यात आल्याची घटना आज (गुरुवार) घडली. यात एक गंभीर जखमी झाला आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या हत्येच्या घटनेने शिरुर शहरात एकच खळबळ उडाली आहे.


पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी दिलेली माहिती अशी कि, प्रशांत लक्ष्मण माळवे उर्फ सांबा (वय.४५, रा.हुडको कॉलनी) या हल्ल्यात तो मृत्युमुखी पडला आहे. हि भांडणे सोडविण्यास गेलेले शिरुर नगरपालिकेचे स्वच्छता सभापती सचिन गुलाब धाडिवाल (वय.३८) हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी आरोपी अमर रघुवीर भैसे याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

या संदर्भात सचिन धाडिवाल यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मयत प्रशांत माळवे याचा भाउ किशोर माळवे हा सचिन धाडिवाल यांच्या दुकानात कामाला होता. त्यामुळे मयत प्रशांत माळवे याचे सचिन  धाडिवाल यांच्याकडे येणे-जाणे होते. प्रशांत माळवे व आरोपी अमर रघुवीर भैसे हे मिञ होते. तीन महिन्यांपुर्वी प्रशांत माळवे यांनी दहा हजार रुपये उसने दिले होते. माळवे यांनी वारंवार पैशांची मागणी करुनही भैसे पैसे देत नसल्यामुळे हि गोष्ट सचिन धाडिवाल यांच्या कानावर घातली. आज दुपारी पावणे एकच्या सुमारास प्रशांत माळवे यांनी सचिन धाडिवाल यांना फोन केला. मी अमर भैसे यांच्या समवेत डंबेनाला येथे थांबलो आहे. तो पैसे देत नाही त्याला पैसे द्यायला सांगा. यानंतर धाडिवाल डंबेनाला येथे गेले असता, तेथे प्रशांत माळवे व अमर यांच्यात जोरदार भांडणे सुरु होती. त्याचवेळेस अमर याने चाकु काढला व माळवे याच्या पोटात चाकुने हल्ला केला. यात माळवे याच्या शरीरावर दहा पेक्षा जास्त वार केले. त्यानंतर धाडिवाल यांनी त्याला मारु नको असे सांगितल्यानंतर आरोपी अमर याने धाडिवाल यांच्या पोटात व पाठीवर चाकु मारला. यानंतर प्रशांत माळवे हा जागीच कोसळला. त्यानंतर आरोपी ने घटनास्थळावरुन पळ काढला व आरोपी स्वत: पोलीस स्टेशनला हजर झाला.

हा प्रकार पाहताच जमलेल्या नागरिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचार करत असताना प्रशांत याचा मृत्यु झाला. पुढील तपास  शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या