शिरुर तालुक्यातील वाढते गंभीर गुन्हे चिंताजनक

No automatic alt text available.
शिरूर, ता.२३ मार्च २०१८ (मुकुंद ढोबळे) : शिरुर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घडलेल्या खुनांच्या घटनांनी शिरुर तालुक्यात कयदा सुव्यस्थेचा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

शिरुर तालुक्यात नवीन वर्षाची सुरुवात झालीच ती कोरेगाव भीमा दंगलीने. कोरेगाव भिमा येथे दंगल झाल्याने गेल्या काहि दिवसांपासुन शिरुर तालुका अशांत झाला.त्यानंतर सनसवाडी येथे भरदिवसा गोळीबार प्रकरण होउन त्यात एकाला जीव गमवावा लागला.पुढील काहि दिवसांत शिरसगाव काटा येथे दुहेरी खुन प्रकरण घडले.यात दोघा वृद्धांचा खुन करण्यात आला.दरम्यान च्या काळात रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत वाघाळे, खंडाळे या भागात खुनाच्या घटना घडल्या.त्याचप्रमाणे मराठी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शिरुर शहरात बसस्थानकासमोर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करुन एकाची हत्या करण्यात आली तर नगगरसेवकावरही हल्ला करण्यात आल्याची घटना घडली.हा सर्व प्रकार गर्दीच्या, रहदारीच्या ठिकाणी भरदुपारी नागरिकांनी पाहिला.

शिरुर तालुक्यात गेल्या काहि महिन्यांपासुन वाढत्या गंभीर खुनांच्या घटनांनी तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचे एकप्रकारे धिंडवडे निघत असुन शिरुर तालुक्यात अशांतता माजविण्यांवर काय कारवाई पोलीसांनी करतात असा सवाल नागरिक करु लागले आहेत.शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीत सणसवाडी गोळीबार प्रकरणाचं काय झालं असा सवाल त्या भागातील नागरिक करत आहेत.शिरसगाव काटा येथे दुहेरी खुन प्रकरण होउनही यातील आरोपींना अटक करण्यात आली नाही.शिरुर शहरात धुमस्टाईल चोरटयांनी एक दोन  नव्हे तर तब्बल सहा चो-या त्याही भर गर्दीत केल्या.रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीतही अधुनमधुन गुन्हेगारी डोके वर काढत असते.

यामुळे शिरुर तालुक्यातील पोलीस यंञणा गाफील आहे की झोपेचे सोंग घेते असा सवाल नागरिक करत आहेत. शिरुर तालुक्यात वाढते गंभीर गुन्हे, चो-या यामुळे शिरुर तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत अनेकांकडुन प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या