निमगावमध्ये जुगार खेळणाऱयांवर कारवाईची मागणी

निमगाव म्हाळुंगी, ता. 23 मार्च 2018: निमगाव म्हाळुंगीमध्ये रिकामटेकडे दिवसभर जुगार खेळ खेळत असून, यामुळे गावातील महिला भयग्रस्त झाल्या आहेत. पोलिसांनी जुगार खेळणाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी महिलावर्ग करत आहे.

शाळेतील हायस्कूलपासून जवळच असलेल्या ओढ्याजवळ बसून हे टोळके दिवसभर जुगार खेळताना दिसतात. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर तर परिणार होतच आहे. शिवाय, गावातील महिला त्या ठिकाणी शेतावर काम करण्यासाठी तयार होत नाहीत. टोळक्यांपासून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, असे नाव न सांगण्याच्या अटीवर एका महिलेने दिली.

दिवसभर जुगार खेळताना पैशांचाही वापर होत असण्याची शक्यता आहे. गावामध्ये दारूचीही मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. या व्यवहारातून भांडणे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रिकामटेकड्या टोळक्याकडून अनेकजण भयग्रस्त झाले आहेत. याबाबतची माहिती पोलिसांच्या कानावर घालण्यात आली आहे. परंतु, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, अशी माहिती एका ज्येष्ठ नागरिकाने दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या