कालिकामाता माध्यमिक विद्यालयात ई लर्निंग संचचे उद्धघाटन


वाघाळे, ता. 23 मार्च 2018:
रोटरी क्लबच्या माध्यमातून कालिकामाता माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात ई लर्निंग संचचे उद्धघाटन माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थी संघाच्या लोकवर्गणीतून स्थानिक निधी उभारून संपूर्ण शाळा डिजिटल करण्याचा संकल्प करण्यात आला.

"असेल इच्छा दांडगी जयाची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला दयावे उत्तर." - वि. दा. करंदीकर.

म्हणजे जीवन जगत असताना तुमची इच्छा दांडगी असेल तर कितीही अडचणी आल्यातरी वेगवेगळे मार्ग सापडतात. जीवनात माणसाच्याअंगी नम्रता ,चांगले संस्कार व योग्य मार्गदर्शक असेल तर तो माणूस यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही,  असे प्रतिपादन रोटरी क्लब शिक्रापूरचे अध्यक्ष डॉ. मच्छिन्द्र गायकवाड यांनी केले.

यावेळी रोटरीचे वीरधवल करंजे, सचिव प्रा. संजय देशमुख, संजीव मांढरे, गावचे सरपंच बबन शेळके, माजी सरपंच तुकाराम भोसले, शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुहास काटे, वाल्मिक गावडे, दिलीप थोरात, गजानन थोरात, विद्यालयाचे संजय मचाले, मारुती सोमवंशी, धनंजय पवार, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष किरण शेळके, निलेश डफळ, विजय शेळके, डॉ. श्रीकांत सोनवणे, दत्तात्रेय सोनवणे, नवनाथ चातुर, पत्रकार संभाजी गोरडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीशचंद्र पाटील यांनी केले व तंटामुक्ती अध्यक्ष संदीप सोनवणे यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या