धुमस्टाईल लुटून पसार होणारे 'ते' बुलेटस्वार जेरबंद

Image may contain: 7 people, people smiling, people sitting
शिरुर,ता.२३ मार्च २०१८(प्रतिनीधी) :
ते गाडीवर यायचे...गोड बोलायचे अन नागरिकांना लुटुन पसार व्हायचे.या संपुर्ण जिल्हयात धुमाकुळ घालणा-या धुमस्टाईल चोरटयांना पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली आहे.

या प्रकरणी अक्षय भारत जगताप उर्फ कठाळे (वय.२४,रा.जयमल्हार कॉलनी, गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक, मुळ. धारुर जि. बीड) व प्रभु उर्फ आकाश बाळु धुमाळ, वय.२० रा.रामोशी आळी, हडपसर मुळ रा.तळे हिप्परगा, ता.जि.सोलापूर) यांना अटक  करण्यात आली आहे.

पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे प्रमुख दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरुर तालुक्यासह संपुर्ण पुणे जिल्ह्यात दुचाकीवर येउन पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तसेच गोड बोलुन नागरिकांना लुटुन पसार होण्याच्या घटना घडत  होत्या.शिरुर येथे (दि.१९ नोव्हेंबर) रोजी कपिल ट्रेडर्स दुकानासमोर कपिल सुरेश बोरा (रा.रेव्हेन्यू कॉलनी, शिरूर) यांना एका बुलेट मोटारसायकल वरून दोन अनोळखी इसमांनी येऊन त्यांना लॉज कुठे आहे असे विचारण्याचा बहाणा करून अंगास झटून नकळत फिर्यादीचे पॅन्टचे खिशातून  ४०,००० रु. रक्कम चोरून नेली होती.म्हणून शिरूर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला होता.तद्नंतर अशाच प्रकारे पत्ता विचारण्याचा बहाणा करून रक्कम लुटण्याचे आणखी प्रकार घडल्यानंतर शिरूर पोलीस.स्टेशन हद्दीत माणिकचंद हॉस्पिटलसमोर, रामआळी,पाबळ फाटा, डंबेनाला, इंदिरा गांधी पुतळा चौक, रांजणगाव पोलीस स्टेशन ला गजानन हॉस्पिटल समोर  आणि भिगवण पोलीस स्टेशन ला भिगवन मेन पेठ येथे असे एकूण मिळुन 8 चोरीचे गुन्हे पुणे जिल्हयात दाखल झाले होते.

शिरुर शहरात भर गर्दीत सलग सहा वेळा दिवसाढवळ्या नागरिकांना लुबाडण्याच्या प्रकारामुळे शिरुर पोलीसांना या महाठकांनी एकप्रकारे चॅलेंज केले होते.त्यामुळे शिरुर पोलीसांना तपास करणे आव्हान होते.याच प्रकरणांचा पुणे ग्रामीण गुन्हे शोध पथक समांतर तपास करत होते.

या पथकातील पोलीसांनी ज्या ठिकाणी अशा पद्धतीने चो-या झाल्या आहेत.अशा ठिकाणी जाउन तपासास सुरुवात केली होती.माहिती घेत असताना काही सीसीटिव्ही फुटेज प्राप्त केले.त्याचप्रमाणे या प्रकारे चोरी करणा-या गुन्हेगारांचा शोध घेण्यास सुरुवात केली. हा शोध घेत असताना या पुर्वी पुणे शहर हद्दीत गुन्हे केलेत परंतु जामिनावर असलेल्या आरोपींचा शोध घेत असताना सीसीटिव्ही फुटेज मधील आरोपी हे मिळते जुळते असल्याची खाञी पटली.पोलीसांनी या आरोपींवर पाळत ठेवली असता अक्षय भारत जगताप उर्फ कठाळे (वय.२४,रा.जयमल्हार कॉलनी,गोपाळपट्टी,मांजरी बुद्रुक, मुळ. धारुर जि.बीड) व प्रभु उर्फ आकाश बाळु धुमाळ, वय.२० रा.रामोशी आळी,हडपसर मुळ रा.तळे हिप्परगा,ता.जि.सोलापुर) हे दोघे पुणे सोलापुर रोड वर थेउर फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाली.या माहितीवरुन या दोघांना सापळा रचुन ताब्यात घेतले असता चौकशीअंती या आरोपींनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एकुन सुमारे ३ लाख हजार रुपये चोरल्याची कबुली दिली.

पोलीसांनी आरोपींना ताब्यात घेउन गुन्हयात वापरलेली युनिकॉर्न व बुलेट गाडी जप्त केली आहे.या आरोपींवर पुणे शहर हद्दीत मार्केटयार्ड, सहकारनगर,लष्कर,भारती विद्यापीठ, भोसरी चंदननगर या पोलीस स्टेशनला सुमारे १२ गुन्हे अशाच प्रकारचे दाखल आहेत.त्या गुन्हयांमध्ये ते जामिनावर सुटले होते.

हे दोन्हीही आरोपी पैलवान असुन लोकांना लुटणेसाठी ते पत्ता विचारण्याचा बहाणा करुन त्यांच्याशी झटापट करताना कुस्तीच्या डावाचा वापर करत असायचे.या आरोपींकडुन आणखी गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता  पोलीसांनी वर्तवली आहे.सदर आरोपींना शिरुर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या आरोपींना पकडण्याकामी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षिरसागर, दत्ताञय गिरमकर, राजु मोमीन,नितीन गायकवाड, महेश गायकवाड, निलेश  कदम, अक्षय जावळे, समाधान नाइकनवरे यांनी मोलाची भुमिका बजावली.

शिरुर शहरात सलग सहावेळा चो-या करुन शहरात धुमाकुळ घालणा-या धुमस्टाइल चोरट्यांना अखेर गुन्हे शाखेने जेरबंद केल्याने शिरुर शहरातील नागरिकांनी गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व पोलीस कर्मचा-यांचे अभिनंदन केले असुन सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या