निमगावमध्ये जुगार खेळणाऱयांना झाली पळता भुई थोडी...

निमगाव म्हाळुंगी, ता. 26 मार्च 2018: निमगाव म्हाळुंगीमध्ये जुगार खेळणाऱयांवर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर पळता भुई थोडी झाली होती. जुगार खेळणारे ऊसातून पळतानाचे चित्र पहायला मिळाले.

शिरूर तालुक्यात आघाडीवर असलेल्या www.shirurtaluka.comने 'निमगावमध्ये जुगार खेळणाऱयांवर कारवाईची मागणी' या मथळ्याखाली वृत्त प्रसारित केले होते.

शिक्रापूर पोलिसांनी वृत्ताची दखल घेत निमगावमध्ये जुगार खेळणाऱयांवर कारवाई केली. रिकामटेकडे जुगार खेळत असलेल्या ठिकाणी पोलिस दाखल झाल्यानंतर जुगार खेळणारे उसाच्या शेतातून सैरावैरा पळू लागले. पोलिस मागे लागल्यानंतर त्यांची पळता भुई खोडी झाली. रिकामटेकडे सैरावरा पळू लागल्याचे चित्र अनेकजण पाहात होते. यामुळे या घटनेची गावात चांगलीच चर्चा रंगली आहे.

दरम्यान, www.shirurtaluka.com या संकेतस्थळाने वृत्त प्रसारित केल्याबद्दल व पोलिसांनी कारवाई केल्यामुळे नागरिकांनी आभार मानले आहेत. परंतु, हे रिकामटेकडे काही दिवसानंतर पुन्हा जुगारीचा खेळ खेळण्यास सुरवात करण्याची शक्यता आहे, यामुळे पोलिसांनी या रिकामटेकड्यांवर बारीक लक्ष ठेवावे व त्यांच्यावर पुन्हा-पुन्हा कारवाई करावी, अशी मागणी महिलावर्गाने केली आहे.

संबंधित वृत्त

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या