कासारीत 'गाव तादात्म्य' कार्यक्रम संपन्न

कासारी, ता.२६ मार्च २०१८ (प्रा.एन.बी.मुल्ला) : कासारी येथे एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या वतीने ‘गाव तादात्म्य’ कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.तीन दिवशीय या शिबिरात 69 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गावात विविध उपक्रम राबविले.

कासारी(ता.शिरूर) येथे एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या वतीने आयोजित‘गाव तादात्म्य’कार्यक्रमात अभियांत्रीकी विभागातील विद्यार्थ्यांनी पहील्या दिवशी जनाजागॄतीसाठी गावातून मशाल फेरी काढली.त्यानंतर पथनाटयाद्वारे महिलांचे सक्षमीकरण, शिक्षणाचे महत्व, स्त्रीभ्रूण हत्येचे दुष्परीणाम, स्वच्छ भारत अभियानाचे महत्व या विषयावर कार्यक्रम सादर करून गावात जनजागॄती केली.तसेच शेती व शेतीपुरक व्यवसायांची बांधणी व रचना परीसर सर्वेक्षणातून सनजून घेण्याचा प्रयत्न महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केला.दुस-या दिवशी सरकारच्या आरोग्यदायी व विविध योजनांची पथनाटयाद्वारे माहीती दिली.तर तीस-या दिवशी शेतक-यांद्वारे शेती व्यवस्थापन कसे केले जाते हे विद्यार्थ्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर मान्यवरांच्या मनोगताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

‘ग्रामीण भारत व शहरी भारत’यामधील तफावत जाणून घेवून ही दरी कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी खासदार अनिल शिरोळे यांचे दत्तक गाव कासारी येथे ‘गाव तादात्म्य’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे कासारीचे सरपंच संभाजी भुजबळ यांनी सांगीतले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक डॉ.विश्वनाथ कराड, कार्यकारी अध्यक्ष राहूल कराड, अभियांत्रीकी विभागाचे अधिष्ठाता डॉ.खेडकर, सहअधिष्ठाती डॉ.देसार्इ, गाव कार्यक्रमाचे अधिष्ठाता डॉ.गव्हाणे व अभियांत्रीकी विभागाच्या प्राध्यापकांनी विशेय प्रयत्न केले.

या कार्यक्रमास सरपंच संभाजी भुजबळ, उपसरपंच शकुंतला रासकर, रावसाहेब काळकुटे, सुनिता तोडकर, सुरेश साबळे, अण्णासाहेब रासकर, समता शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ.राजेंद्र ढमढेरे, रोहीदास नवले, अशोक रासकर, राजेंद्र साबळे, तबन भुजबळ आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या