शिक्षण संस्थांमधून संस्कारांचे शिक्षण मिळणे आवश्यक

तळेगाव ढमढेरे, ता.२६ मार्च २०१८ (प्रा.एन.बी.मुल्ला) : शिक्षण संस्थांमधून संस्कारांचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे असे प्रतिपादन माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी केले.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील जयवंत पब्लिक स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले मुलींसाठी शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पलांडे बोलत होते. जयवंतअण्णा भुजबळ  यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात विद्यालयात प्रवेश घेतलेल्या प्रत्येक मुलीला सावित्रीबाई फुले मुलींसाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत ३ हजार  रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. तसेच स्व. जयवंतअण्णा भुजबळ  सख्या भावंडांसाठी सवलत योजना जाहीर करण्यात आली. या योजनेअंतर्गत विद्यालयात प्रवेश घेतलेल्या सख्या भावंडांना प्रत्येकी ३ हजार रुपयांचा धनादेश दरवर्षी देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे अध्यक्ष पांडूरंग राऊत, शिक्षण प्रसारक मंडळाचे मानद सचिव अरविंददादा ढमढेरे, जि. प. सदस्या कुसुम मांढरे, शिरूर पंचायत समितीच्या उपसभापती मोनिका हरगुडे, शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष विश्वास ढमढेरे, माजी उपाध्यक्ष अनिल भुजबळ, सरसंघचालक संभाजी गवारे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, ज्ञानेश्वर भुजबळ, पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण भुजबळ, डॉ. एल. के. कदम, रविंद्र भुजबळ, महेश भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते. व्यावहारिक ज्ञानासाठी मातृभाषा अवगत असणे आवश्यक असल्याचे मत यावेळी बोलताना अरविंददादा ढमढेरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल भुजबळ यांनी केले. प्रतिभा पंदालगे यांनी सूत्रसंचालन केले तर सजनी दवे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या