अण्णापूरमधील पाणपोई भागवतेय पांथस्थांची तहान

Image may contain: 8 people, people smiling, people standing and outdoorअण्णापूर, ता.२६ मार्च २०१८ (ज्ञानेश पवार) : आजकालची तरुण पिढी सोशल मिडीयाच्या आहारी गेली असताना शिरुर तालुक्यातील अण्णापूर येथील युवक सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतुन गेल्या सहा वर्षापासुन शिरुर-भिमाशंकर रस्त्यावरून प्रवास करणा-या पांथस्थांची अंजनबाबा पाणपोईच्या माध्यमातून तहान भागविण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.

1एप्रिल 2012रोजी अण्णापूर (ता.शिरूर) येथील झंजाडवस्तीच्या तरुणांनी एकत्र येऊन  अंजनबाबा प्रतिष्ठानची स्थापना केली व  त्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवत आहेत .गेल्या सहा वर्षापूर्वी या प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.संतोष झंजाड यांच्या संकल्पनेतून अंजनबाबा पाणपोई उभारणी करण्यात आली. त्यासाठी अंजनबाबा प्रतिष्ठान चे शिलेदार स्व.संदीपभाऊ झंजाड यांचे विशेष सहकार्य मिळाले. त्याच प्रमाणे रोहीदास झंजाड, मोहन झंजाड, हरिष झंजाड, मछिंद्र झंजाड, शरनू भंडारी, गणेश झंजाड, सागर झंजाड ,भाऊ झंजाड, शंकर झंजाड,सुभाष झंजाड,भाऊ दसगुडे,केशव शिंदे या सर्वांची बहमोल साथ त्यांना मिळाली.

या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा या भावनेतुन शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप,पक्षांना चारा,अनाथ मुलांना गरजेनुसार साहित्य,वृक्षारोपन त्याचप्रमाणे नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून निराधार वृद्ध व्यक्तींना ,विधवा महिला यांना  शासकीय अनुदान मिळून देण्यासाठी विशेष प्रयत्न त्याच प्रमाणे रोजगार शिबिर आयोजीत करून अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार मिळून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या