रांजणगावमध्ये बलात्कारप्रकरणी एकावर गुन्हा

रांजणगाव गणपती, ता.२६ मार्च २०१८(प्रतिनीधी) : रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथे युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलीसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.

शरद फंड (रा. रांजणगाव गणपती) असे बलात्कार करणा-या आरोपीचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शरद फंड यांचे रांजणगाव येथे पृथ्वीराज एंटरप्रायझेस नावाचे दुकान आहे.फिर्यादी या अॉफिस मध्ये आरोपी हा जवळ येउन बोलत असताना संबंधित युवतीने लांबुन बोला असे सांगितले.त्याचप्रमाने त्या युवतीला योग्य वर्तन करताना न दिसल्याने तेथुन निघुन जात असताना आरोपी ने त्या युवतीला अॉफिसमध्ये ओढुन खाली पाडले. व मारहान करुन जबरदस्तीने अत्याचार केला.

या नंतर युवतीने रांजणगाव पोलीस स्टेशन ला धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार नोंदविली.पोलीसांनी या प्रकरणी आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेचा पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अमोल गोरे हे करत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या