शिरुर पोलीसांकडून दरोड्यातील ७ आरोपींवर मोक्का

शिरूर, ता.२७ मार्च २०१८(प्रतिनीधी) : शिरुर पोलीसांनी ७ आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंञण अधिनियम (मोक्का) या कायद्याखाली कारवाई केली असल्याची माहिती शिरुर पोलीसांनी दिली.

शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत संविदणे येथे लाकडी दांडके, लोखंडी गज कु-हाड यांचा धाक दाखवुन दरोडा टाकुन लुटमार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रमेश नरसिंग भोसले(रा.लोणी व्यंकनाथ, ता.श्रीगोंदा), रामदास उर्फ चिवडया उर्फ शिवा गोपाळ काळे(रा.निघोज), पप्पु आलम काळे(रा.निघोज), राघेश उर्फ राघ्या संजय काळे(रा.रा.गुणोरे,ता.पारनेर),राहुल अर्पण भोसले, बाळु झारु भोसले, गिरीश आलम काळे(रा.निघोज) यांनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.त्यामुळे पोलीसांनी रामदास उर्फ चिवडया उर्फ शिवा गोपाळ काळे(रा.निघोज), पप्पु आलम काळे(रा.निघोज), राघेश उर्फ राघ्या संजय काळे(रा.रा.गुणोरे,ता.पारनेर) ,गिरीश आलम काळे(रा.निघोज) यांना अटक करण्यात आली होती.

त्यामुळे शिरुर पोलीसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंञण अधिनियम(मोक्का) अंतर्गत कारवाई होण्यासाठी पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे मोक्का  अंतर्गत कारवा़ई होण्यासाठी प्रस्ताव पाठविला होता.त्याबाबत पडताळणी झाल्यानंतर पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी मोक्का अंतर्गत वाढीव कलम लावण्यास मंजुरी दिली.त्यानंतर गुन्हयाचा तपास पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे यांनी करुन करुन गुन्हयातील अटक व फरारी आरोपींविरुद्ध मोक्का कोर्टात दोषारोपपञ पाठविणेकरिता अप्पर पोलीस महासंचालक यांची पुर्वपरवानगी प्राप्त केली.व या गुन्हयातील रामदास उर्फ चिवडया उर्फ शिवा गोपाळ काळे(रा.निघोज), पप्पु आलम काळे(रा.निघोज), राघेश उर्फ राघ्या संजय काळे(रा.रा.गुणोरे,ता.पारनेर),राहुल अर्पण भोसले, बाळु झारु भोसले, गिरीश आलम काळे(रा.निघोज) यांनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.त्यामुळे पोलीसांनी रामदास उर्फ चिवडया उर्फ शिवा गोपाळ काळे(रा.निघोज), पप्पु आलम काळे(रा.निघोज), राघेश उर्फ राघ्या संजय काळे(रा.रा.गुणोरे,ता.पारनेर) ,गिरीश आलम काळे(रा.निघोज), व फरारी असणारे मेश नरसिंग भोसले,राहुल अर्पण भोसले, बाळु झारु भोसले यांच्याविरुद्ध सबळ पुराव्यानिशी दोषारोपपञ मोक्का कोर्टात दाखल करण्यात आले.

यापुढेही शिरुर पोलीसांकडून संघटित गुन्हेगारांचे रेकॉर्ड तयार करुन कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या