तब्बल २० वर्षांनी पुन्हा भरली शाळा...

Image may contain: 32 people, people smiling
भोसरी,
ता.२७ मार्च २०१८ (गणेश थोपटे) :
  भोसरी येथील भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेच्या प्रांगणात तब्बल २० वर्षांनी मिञांनी जुन्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाची सुरुवात भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रावसाहेब नागरगोजे यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आली.

यावेळी नागरगोजे बोलताना म्हणाले की, प्रत्येकाने स्वतःची ताकत ओळखून समाजाची आणि स्वतःची प्रगती केली पाहिजे तसेच संदातून सर्व प्रश्न सोडविता येतात त्यामुळे सवांद फार महत्वाचा आहे." ते पुढे म्हणाले, "तुम्ही स्वतःला असे घडवा कि तुमच्या मुला/मुलींनी तुमच्याकडूनच सर्व चांगले गुण आणि संस्कार घेतले पाहिजे तसेच फक्त पैशाच्या मागे न धावत आत्मिक समाधान सुद्धा फार महत्वाचे असते. त्यामुळे पैसा जरून कमवा परंतु तो किती आणि कसा कमावताय हे महत्वाचे आहे तसेच तो योग्यवेळी आणि योग्यठिकाणी खर्चही करायला पाहिजे."

माजी विद्यार्थीच्या मनोगतामध्ये गणेश थोपटे यांनी गेट टूगेदरचा विषय कसा निघाला आणि याची सुरुवात कशी झाली तसेच सोशल मिडियाच्या साह्याने आपण एक-एक मित्र कसे शोधले आणि या संपूर्ण कार्यक्रम राबविण्यासाठी कशा प्रकारे रचना/मिटींग्स घेतल्या. तेसच हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता स्थापन केलेल्या कोर कमिटीने कशे शिस्तबद्ध आणि प्रामाणिकपणे काम केले याचाही आढावा यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितला. तसेच काही माजी विद्यार्थीनी आपल्या शाळेतील जुन्या आठवणी बोलून दाखवल्या, शिक्षकांनीही सर्व विद्यार्थीनी मार्गदर्शन केले.
Image may contain: 10 people, people smiling, people standing

या गेट टूगेटर कार्यक्रमाच्या माध्यमातून  १०वी तील १९९६-१९९७ सालचे 'क' आणि 'ड' तुकडीतील  एक एक मित्र/मैत्रिणी शोधत असताना तब्बल वीस वर्षानंतर एकदम दुर्लक्षित झालेला राजु  या मिञाला  डोळ्यांचा गंभीर आजार झाल्याचे लक्षात येताच सर्वांनी मदत करण्याचे ठरविले.त्यानुसार सर्वांच्या सहकार्यातुन राजु या मिञाला ऑपेरेशनसाठी आर्थिक साहाय्य केले जाणार आहे. तसेच योगायोगाने राजू शेडगेचा वाढदिवसही याच कार्यक्रमाच्या दिवशी आल्यामुळे राजुचा वाढदिवस आणि त्याची पार्श्वभूमी सतीश रेटवडे यांनी सांगून राजुचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.
 
कार्यक्रमामध्ये सर्व शिक्षक/शिक्षिका तसेच कर्मचारी वर्ग यांचा विद्यार्थीनी शाल, मोमेंटो तसेच पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी प्रत्येकाला एक रोप देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रम संपल्यांनंतर सर्व शिक्षक,कर्मचारी आणि विद्यार्थीनी स्नेह भोजनाचा आनंद घेत शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.

या कार्यक्रमाला भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष रावसाहेब नागरगोजे, उप-मुख्याध्यापक रामचंद्र जगताप तसेच सर्व आजी-माजी/सेवानिवृत्त मुख्याध्यापक, उप-मुख्याध्यापक, सर्व शिक्षक,शिक्षिका आणि कर्मचारीवर्ग खेड, आंबेगाव, शिरूर, पिंपरी चिंचवड परिसरातून १०० हुन अधिक माजी विध्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.

मान्यवरांचे स्वागत श्रीकांत साखरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र भोसले तसेच अ‍ॅड. सुनिता खैरे यांनी केले. या स्नेहमेळाव्याचे आयोजन १०वी तील १९९६-१९९७ सालचे 'क' आणि 'ड' तुकडीतील सर्व माजी विद्यार्थ्यांनी केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या