शिरुर शहरात किरकोळ कारणावरुन तीक्ष्ण हत्याराने वार


शिरूर, ता. २८ मार्च २०१८ (प्रतिनीधी) : किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचा कारणावरून नगरपालिकेच्या घंटागाडी वर काम करणा-या चालकावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आल्याची घटना शिरुर शहरात घडली. भरबाजार पेठेत हा प्रकार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, रामा वसंत जाधव (रा. सिद्धार्थ नगर, शिरूर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की २६ मार्च ला संध्याकाळी ९ च्या सुमारास गौतम चव्हाण यांचा भाचा सोनू जीवन भंडारी यांस संजय कांतीलाल बो-हाडे याने किरकोळ कारणावरून दमदाटी केली होती त्यावेळी चव्हाण याने संजय बो-हाडे यांस समाजवून सांगितले होते व त्याचे आपापसांत मिटले होते.

दरम्यान (दि.२७) रोजी सकाळी आठच्या सुमारास शहरातील हलवाई चौकात गौतम चव्हाण हे नगरपालिकेचा घंटागाडीवर कचरा गोळा करीत असताना राहुल कांतीलाल बो-हाडे व गणेश प्रभू लोंढे दोघेही राहणार शांतीनगर शिरूर हे मोटारसायकल वरून तिथे आले आणि राहुल याने त्याचेजवळील कोयत्याने गौतम चव्हाण यांच्या कानावर व गालावर वार केला. यात चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहेत.दरम्यान शहारातील हलवाई चौक हा परिसर या भरमध्यवस्तीतील असून या ठिकाणी हा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यासंदर्भातील आधिक तपास शिरुर पोलीस करत आहे.

शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार गंभीर गुन्हे घडत असुन दिवसाढवळ्या तीक्ष्ण हत्याराने वार होत  असल्याने गुन्हेगारांना पोलीसांचा धाक राहिलाय का नाही असा सवाल व्यक्त केला जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या