चर्मकार समाजाचा रविवारी शिरुरला भव्य मेळावा

शिरुर,ता.३० मार्च २०१८(प्रतिनीधी) : राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने रविवार(दि.१) रोजी चर्मकार समाज मेळावा व वधुवर परिचय नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष विजेंद्र गद्रे यांनी दिली.

या मेळाव्यात चर्मकार समाजातील महिला, युवक,उद्योजक, कार्यकर्ते महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या विविध समस्यांवर चर्चा व्हावी या हेतुने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असुन समाजातील गुणवंत विद्यार्थी व कर्तृत्ववान व्यक्ती यांचा सत्कार करण्यात येणार आहे.पहिल्या सञात विविध भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते, यांच्या समस्यांवर मार्गदर्शन केले जाणार आहे तर दुस-या सञात विविध जिल्ह्यातुन आलेल्या विवाहेच्छुकांचा परिचय नोंदणी, वधुवर-पालक संवाद सञ,परिचय पञाचे आदानप्रदान केले जाणार आहे.

या मेळाव्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष व माजी समाजकल्याण मंञी बबनराव घोलप अध्यक्ष म्हणुन तर खासदार सदाशिव लोखंडे, आमदार बाबुराव पाचर्णे, माजी आमदार अशोक पवार, पोपटराव गावडे, सुर्यकांत पलांडे, नगराध्यक्षा वैशाली वाखारे, उद्योगपती प्रकाश धारिवाल, चर्मोद्योग  मंडळाचे महासचिव ज्ञानेश्वर कांबळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष  शशिकांत सोनवणे, महिला प्रदेशाध्यक्षा डॉ.मीराताई शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.या मेळाव्याला व वधुवर परिचय नोंदणी कार्यक्रमाला  चर्मकार समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विजेंद्र गद्रे,तुषार अडसुळ यांनी केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या