निमगाव दुडेत जुन्या वादावरुन दोन गटात राडा

शिरुर, ता.३० मार्च २०१८(प्रतिनीधी) : निमगाव दुडे (ता.शिरूर) येथे पुर्व वैमनस्यातुन दोन गटांत तुंबळ वाद झाल्याने शिरुर पोलीस स्टेशनला परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत.

शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी राजेश बाजीराव घोडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार स्वप्नील छगन रणसिंग, दिलीप अशेक साळुंखे, रवी छगन रणसींग, अरुण अशेक साळुंखे, बाबाजी सुखदेव दुडे, कांडीभाउ सुखदेव दुडे, प्रवीण कांडीभाउ दुडे, अजित चंद्रकांत गावडे, महेंद्र नायकोडी, लहु निचीत, धांडा जाधव, प्रकाश साळुंखे, पवन साळुंखे, अजीत सोनभाऊ गावडे व इतर पाच ते सात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे कि, निमगाव दुडे येथील राजकारणाच्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी यांची बहीण शोभा हिस शिवीगाळ केल्यानंतर फिर्यादी यांची आई पुढे येउन काय झाले असे विचारल्याच्या कारणावरून आरोपी बाबाजी सुखदेव दुडे यांनी त्यांच्या अंगावर धावून आले त्यांने तलवारीने फिर्यादी यांच्यावर धावून जाउन फिर्यादीच्या डोक्यात तलवार घातली परंतु तो वार फिर्यादीचे डाव्या हातावर झाला. अक्षय शिवाजी घोडे हा फिर्यादीस वाचविण्यासाठी पुढे आला असता कोयत्याने त्याचे दंडावर वार केला त्याच्या सोबत इतरांनी तिथे येउन फिर्यादीचे घराचे दिशेने दगडफेक करून फिर्यादीचे चार चाकी वाहनाच्या काचा फोडून नुकसाने केले असल्याचे म्हटले आहे.तर दुसरी फिर्याद अशोक तबाजी सांळुखे यांनी दिलेली असून 1) अमोल बाजीराव घोडे  2) राहुल घोडे, 3) शिवाजी घोडे, 4) संतोष  घोडे व इतर 7 ते 8 जनांवर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी शिरुर पोलीसांनी दोन्ही गटातील आरोपींविरुद्ध तक्रार नोंदविली असून काही जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या