निमगावात वाळू चोरांकडून सव्वा कोटीचा दंड वसूल

तळेगाव ढमढेरे, ता.३० मार्च २०१७ (जालिंदर आदक) : निमगाव म्हाळुंगी येथे महसुलच्या अधिका-यांनी वाळुचोरांकडुन सुमारे सव्वा कोटीचा दंड वसुल केला असुन त्याचा नुकताच अहवाल सादर केला आहे.

सदरील उत्खनन हे शिरूर पंचायत समितीचे सदस्य विजय सोमनाथ रणसिंग व अक्षय गजानन रणसिंग यांनी केलेले आहे असा अहवाल गाव कामगार तलाठी निमगाव म्हाळुंगी यांनी सादर केला होता. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६चे कलम ४८(७)अन्वय दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये याबाबत या कार्यालयाकडील नोटीस बजावण्यात आली.आणि यांचे म्हणणे मांडणे कामी खुलाशाचे अवलोकन केले. यावरून संबंधितांनी अनाधिकृत मातीमिश्रीत वाळू या गौण खनिजाचा वापर केलेले सिद्ध होत आहे.  ४५० ब्रास वाळू या गौण खनिजावर महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार दंडाची रक्कम पाचपट अशी होती. यामध्ये शिरूर तहसीलदार रणजित भोसले यांनी विजय सोमनाथ रणसिंग व अक्षय गजानन रणसिंग यांना १ कोटी १४ लाख ३० हजार रुपये दंडाची रक्कम भरण्याचे आदेश दिले आहे. तसेच दुसऱ्या ठिकाणी कामिनी ओढ्यात सहा ब्रास अनधिकृत वाळू काढल्याप्रकर्णी १लाख ५२ हजार ४०० इतका दंड आकारला आहे.

निमगाव म्हाळुंगी येथील गट नंबर ११७९ मधील वाळू उपसा प्रकरणी विजय राणसिंग यांस २लाख३हजार दोनशे आकारला आहे.  गट नंबर ४५६/५ यातील बेकायदेशीर वाळू उपसल्याबाबत धनंजय टेमगिरे यांस ७६लक्ष २०हजार असा दंड आकारला आहे.निमगाव म्हाळुंगी येथील गट नंबर ५१९ मधील मालक वसंत नारायण भागवत व इतर यांच्या संमतीने बापू चिंतामन येळे व इतर (रा.पारोडी)यांनी मोठ्या प्रमाणात पोकलेनच्या साह्याने अनधिकृत उत्खनन करून वाळू काढण्यात आलेली असून या गटामध्ये तीन खड्डे केले होते या पात्रातून माती सहीत वाळू अंदाजे ४५६ ब्रास यापैकी निव्वळ वाळू उत्खनन करून वाळू काढण्यात आलेली आहे असा अहवाल गावकामगार तलाठी निमगाव म्हाळुंगी व मंडल अधिकारी तळेगाव ढमढेरे यांनी सादर केला होता यांना ४४ लाख ६ हजार ४०० रुपये दंड करण्यात आला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या