भारत अगेंस्ट करप्शन संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी घायतडक

करडे,ता.३० मार्च २०१८(प्रतिनीधी) : भारत अगेंस्ट करप्शन संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी बंटी घायतडक यांची नुकतीच निवड करण्यात आली.
घायतडक यांना भारत अगेंस्ट करप्शन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांच्या हस्ते नुकतेच निवडीचे पञ  देण्यात आले.घायतडक हे गेल्या अनेक वर्षांपासुन सामाजिक उपक्रमात हिरीरीने भाग घेत असुन त्यांनी  करडे व कारेगाव परिसरात तरुणांच्या समस्या सोडविण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.त्यांच्या याच कार्याची दखल घेत हेमंत पाटील यांनी घायतडक यांची तालुकाध्यक्षपदी व विजय दिवेकर यांची सचिव पदी निवड करण्यात आली.

निवडीनंतर बोलताना घायतडक हे म्हणाले कि, या संघटनेच्या माध्यमातुन सर्वसामान्यांच्या तळागाळातील लोकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या