व्यंकटेश कृपा कारखान्यातील बगॅस ला भीषण आग

शिक्रापूर, ता.३० मार्च २०१८(हेमंत चापुडे) : जातेगाव येथील व्यंकटेश कृपा कारखान्यातील बगॅस ला भिषण आगल्याची घटना घडली असुन आग आटोक्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष संदिप तौर यांनी दिली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास कारखान्यातील बगॅस ला अचानक आग लागली.आग लागल्याचे लक्षात  येताच स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आटोक्यात येत नसल्याने अखेर चार ठिकाणांहुन अग्निशमन यंञणांना पाचारण करण्यात आले.या अग्निशामक यंञणा घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पाण्याचा मारा करण्यात आला.

या बाबत कारखान्याचे अध्यक्ष संदिप तौर यांच्याशी संपर्क साधला असता आगीच्या भक्ष्यस्थानी बगॅस मोठ्याप्रमाणावर बगॅस सापडल्याने अंदाजे तीन कोटी पेक्षा जास्त किंमतीचा बगॅस जळुन खाक झाला असुन आग सध्या आटोक्यात आणण्यात यश आल्याची माहिती बोलताना दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या