पारोडी येथील गाया चोरणारे चोरटे गुन्हे शाखेकडून अटकेत

तळेगाव ढमढेरे,ता.३१ मार्च २०१८(जालिंदर आदक) : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारोडी(ता.शिरुर) येथील गायी चोरणा-या  चोरट्यांना शिताफीने अटक केली आहे.

तळेगाव ढमढेरे परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून गाई चोरीचे प्रमाण वाढले होते त्यातच पारोडी येथील कविता टेमगिरे यांच्या ५ जर्शी गाया चोरी गेल्याची घटना घडली होती. त्यांचा गोठ्यावर कामगार असून हा कामगार रात्री झोपी गेल्यानंतर रात्रीच्या तीनच्या सुमारास गोठ्यातील पाच जर्सी गाय व त्याच्या जवळील दोन मोबाईल असे चोरी गेल्याचे लक्षात आले होते. सदर गाय़ांचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला परंतु त्या मिळाल्या नाहीत त्यानंतर शिक्रापूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती.

पारोडी येथील गावच्या हद्दीतील येळेवस्ती येथे असलेल्या गोठ्यांमधून पाच जर्सी गायींची किंमत अंदाजे  एक लाख सत्तावीस हजार प्रमाणे आहे.

या चोरीप्रकरणी  रामभाऊ गुणवरे, (वय.२२ वर्षे रा.स्वामी चिंचोली ता.दौंड),  विशाल गुनवरे (वय २७.सर्वजन राहणार अजनुज ता. श्रीगोंदा), संदीप नामदेव गिरमकर, दिगंबर नारायण काळे, अमोल नामदेव गिरमकर, राहुल माने, भगवान दिगंबर काळे. अतुल कदम, राहुल दिलीप गुणवरे, वैभव किसन गुणवरे, अजय नाना गुणवरे, दीपक रामभाऊ गुणवरे, सागर कदम सर्वजन राहणार गुणवरे वस्ती, स्वामी चिंचोली तालुका दौंड) यांनी चोरी केल्याची माहिती मिळाली.
 
त्यानुसार गुन्हे शाखेचे प्रमुख दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षिरसागर,महेश मुंडे सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरमकर, नितीन गायकवाड, पी.एम गायकवाड, एन.जी गायकवाड, सुभाष राऊत, राजु मोमीन, एस. बी कदम, यांनी आरोपींचा शोध घेत असताना आरोपी क्रमांक एक व दोन हे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता व त्यांनी व वरील आरोपी यांनी  पाच गायांची चोरी केली असल्याचे कबुल केले संदीप गिरमकर यांच्या टेम्पोमधून (अजनुज,ता.श्रीगोंदा जि अहमदनगर) येथे घेऊन गेले होते. व सदर गाया ह्या संदीप गिरमकर आणि दिगंबर काळे यांचेकडे असल्याबाबत सांगितल्या. तसेच इतर आरोपी यांचा पोलिस तपास करत आहेत.


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या