पाटबंधारे अधिका-यांनी केली बंधा-यावरुनच गळतीची पाहणी

मांडवगण फराटा,ता.१ एप्रिल २०१८(राजेंद्र बहिरट) : मांडवगण फराटा(ता.शिरुर) येथील कोल्हापुर पद्धतीच्या बंधा-याची सातत्याने होणा-या गळतीची पाहणी  पाटबंधा-याच्या अधिका-यांनी बंधा-याच्या वरुनच केली. यावेळी  उपस्थित शेतक-यांनी पाटबंधा-याच्या  अधिका-यांवर संताप व्यक्त करत प्रश्नांचा भडिमार केल्याने यांवर उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगत बंधा-याजवळुन काढता पाय घेतला.

सविस्तर असे कि, मांडवगण फराटा ते कानगाव दरम्यान भिमानदीवर कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा आहे.या वर्षी पाउस मुबलक प्रमाणात झाल्याने हा बंधारा पुर्ण क्षमतेने भरलेला होता.परंतु पावसाळ्यानंतर या बंधा-याला आजतागायत सातत्याने गळती होत  आहे.या पुर्वी बंधा-यामधुन गळती होत असल्याने दोन वेळा गळती थांबविण्यासाठी ढापे बदलण्याची मलमपट्टी करण्यात आली.परंतु तरी देखिल बंधा-याच्या ढाप्यांमधुन सातत्याने गळती होत असल्याने पुर्ण क्षमतेने भरलेला बंधारा आजरोजी रिकामा होण्याच्या मार्गावर आला आहे.या परिसरातील दौंड व शिरुर तालुक्याच्या लाभक्षेञातील शेतक-यांची हजारो हेक्टर शेती अवलंबुन आहे.पावसाळा सुरु होई पर्यंत तीन महिने शेतक-यांची शेती याच पाण्यावर अवलंबुन आहे परंतु बंधा-यातील पाणी साठा आताच संपत चालला असुन तीस ते चाळिस टक्केच साठा शिल्लक असल्याने व गळती वारंवार उपाय करुनही हि पाण्याची गळती थांबत  नसल्याने शेतक-यांच्या पिकांना ऐन उन्हाळ्यात धोके पोहोचण्याची शक्यता शेतक-यांनी व्यक्त केली आहे.

या संदर्भात शनिवार(दि.३१) रोजी तंटामुक्तीचे अध्यक्ष हणुमंत फराटे, धनंजय फराटे,महेश शितोळे, निलेश शितोळे,हनुमंत शितोळे आदींनी बंधा-यांची पाहणी केली या वेळी बंधा-यांच्या वरुनच पाहणी करणा-या अधिका-यांना सततच्या गळतीबाबत शेतक-यांनी जाब विचारला.या वेळी संबंधित अधिका-यांनी लवकरच होणा-या गळतीवर उपाययोजना केली जाणार असुन पाणी साठा भरपुर आहे,थोडीफार गळती सुरुच राहणार अशी उत्तरे दिली.त्यामुळे शेतक-यांनी नाराजी व्यक्त केली.संबंधित ठेकेदाराने या वेळी उपस्थितांसमोर गेल्या दोन वर्षांपासुन कामाचे बिलच मिळाले नसल्याचे सांगितले.तर शेतक-यांनीही बिले मिळाले नाही म्हणुन अशी कामे केली का असा सवाल संबंधित ठेकेदाराला केला. शेतक-यांनी सातत्याने प्रश्नांचा भडिमार केल्याने आलेल्या अधिका-यांनी लवकर काम चालु करु असे म्हणत बंधा-यापासुन काढता पाय घेतला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या