रांजणगाव सांडसची भैरवनाथाची आज व उद्या याञा

रांजणगाव सांडस,ता.१ एप्रिल २०१८(प्रतिनीधी) : येथिल जागृत देव श्री भैरवनाथ दैवताची यात्रा आज रविवारी(दि.१ व दि.२) रोजी सालाबादप्रमाणे साजरी होणार असल्याची माहिती उपसरपंच राहुल रणदिवे यांनी दिली.

आज रविवारी पहाटे श्री चा अभिषेक ,पूजा आरती, नैवेद्य आदी होणार असुन नागरिकांचे नवस याच दिवशी फेडले जाणार असून सायंकाळी श्री चा पालखी मिरवणूक, छबिना ढोल ताशांच्या गजरात निघणार आहे.

आज सायंकाळी संध्या माने यांच्या लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे.दुसऱ्या दिवशी सकाळी हजेऱ्यांचा  तसेच सायंकाळी जंगी कुस्त्या चा निकालीआखाडा भरणार आहे.या कुस्त्यांच्या आखाड्यासाठी राज्यभरातुन मल्ल येणार असुन ग्रामस्थांच्यावतीने याञेची सर्व तयारी पुर्ण झाली असल्याचे बोलताना सांगितले.यात्रेत कोणताही अनुचीत प्रकार घडणार नाही यासाठी यात्रा कमिटी ने नियोजन केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या