गणेश रासकर गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Image may contain: 9 people, people smiling, people standingअण्णापूर,ता.३ एप्रिल २०१८ (प्रा.ज्ञानेश पवार):  शिरूर तालुक्यातील अण्णापूरचे गणेश रासकर यांना  २०१७-१८चा पंचायत समिती चा गुणवंत शिक्षक पुरस्काराने नुकतेच शिरुर पंचायत समितीचे सभापती सुभाष उमाप यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

गणेश रासकर हे सध्या शिरुर ग्रामीण येथिल प्राथमिक  शाळेत पदवीधर शिक्षक म्हणून  काम करत आहेत.यापूर्वी  बीड जिल्ह्यात तर शिरूर तालुक्यातील कुरंदळे धनगरवस्ती येथे  त्यांनी  सेवा केली आहे.  त्यांनी या सर्व ठिकाणी  विद्यार्थ्यांच्या   बौद्धिक,शारिरीक व सर्वांगींण विकासासाठी अनेक नवनवीन उपक्रम राबवले आहे. अण्णापूर येथील कुरंदळेधनगरवस्ती येथे शाळेच्या सर्वांगीण प्रगती साठी त्यांनी वृक्षारोपन, गुणवत्ता विकास आदी कार्यक्रम  राबवले होते. सरदवाडी व मलठण केंद्रातील एक उपक्रमशील, तंत्रस्नेही शिक्षक  म्हणून  त्यांची ओळख आहे.

त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे , शिरुर तालुका पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेचे अध्यक्ष  शहाजी पवार,प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष  बापुसाहेब लांडगे , अखिल संघटनेचे  अध्यक्ष  रामेश थोरात, समितीचे अध्यक्ष   सतिश नागवडे, पतसंस्थेचे संचालक बाळासाहेब आसवले, मुख्याध्यापक सच्चिदानंद थेऊरकर  यांनी अभिनंदन केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या