राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेला शिरुरला उत्सफुर्त प्रतिसाद

शिरुर,ता.५ एप्रिल २०१८(प्रतिनीधी) : शिरुर येथे भारतीय अल्पसंख्यांक संघटना व पुणे जिल्हा कॅरम संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार चषक दोनदिवसीय राज्यस्तरीय ओपन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेस राज्यभरातील स्पर्धकांनी सहभाग घेतला  असल्याची माहिती शिरुर शहर भाजप अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष हुसेन शहा यांनी दिली.

शनिवार(दि.३१) रोजी या स्पर्धेचे उद्घाटन आमदार बाबुराव पाचर्ने यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रसिद्धीप्रमुख राजेंद्र चव्हाण हे होते तर शिरुर शहर भाजप अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष हुसेन शहा यांच्यासह  राजु शेख, हुसेन शहा, हमीद पठाण, ताहिर असी आदींनी आयोजन केले होते.या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत अल्पसंख्याक आघाडीच्या महिला प्रदेशाध्यक्षा  रेश्मा हमीद पठाण यांनी केले.

या वेळी बोलताना आमदार पाचर्णे म्हणाले कि,मैदानी खेळाबरोबरच बौद्धिक खेळांची आवश्यकता असुन अशा स्पर्धा आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले.कॅरम खेळाच्या वृद्धीसाठी शिरुर शहरात स्वतंञ कॅरम उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन या वेळी उपस्थितांना दिले.तर क्रिडा अधिकारी दत्ताञय सलगरे,राजेंद्र चव्हाण यांनी स्थानिक पातळीवर अडचनी सोडवुन कॅरम साठी प्रयत्न करु असे सांगितले.या कार्यक्रमाला नगरसेवक मंगेश खांडरे,वडार समाज तालुकाध्यक्ष जालिंदर पवार,भाजपा शहराध्यक्ष केशव लोखंडे,माजी नगराध्यक्ष नसीम खान,मुस्लिम जमातचे इक्बाल शेख,वसंत वैराळ, आदी उपस्थित होते.दोन दिवसीय चाललेल्या या स्पर्धेत महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास भाजपाच्या तालुकाध्यक्षा  वैजयंती चव्हाण,माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षिरससागर,अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष ताहिर असी, रेश्मा पठान,रेश्मा शेख, भाजपा शहराध्यक्ष हुसेन शहा,तालुका  सरचिटणीस गोरक्ष काळे, शहर सरचिटणीस राजु शेख, युवा मोर्चाचे मितेश गादिया, नवनाथ जाधव,निलेश नवले, विजय नरके, विजय क्षिरसागर,सुनिल गुप्ता,उद्योजक संदिप बिहाणी, हर्षद ओस्तवाल, तुषार वेताळ आदी उपस्थित होते.

महिला कॅरम स्पर्धा
शहजान पंजाबी,पुणे-प्रथम क्रमांक
शाहीन सय्यद,शिरुर- दुसरा क्रमांक
प्राची थोरात,शिरुर-तृतीय क्रमांक
रेश्मा पठाण,न्हावरा-चतुर्थ क्रमांक

पुरुष कॅरम स्पर्धा
वसंत वैराट,पुणे-प्रथम क्रमांक
निखिल काकडे,पुणे-द्वितीय क्रमांक
राहुल भागवत-तृतीय क्रमांक

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या