शिरुरला २०० वधु-वरांची नोंदणी- विजेंद्र गद्रे

Image may contain: 12 peopleशिरुर,ता.५ एप्रिल २०१८(प्रतिनीधी) : शिरुर येथील चर्मकार समाजाच्या मेळाव्यात सुमारे २०० विवाहेच्छुकांनी वधु-वर नोंदणी केल्याची माहिती राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष विजेंद्र गद्रे यांनी दिली.

राष्ट्रीय चर्मकार महासंघ शिरुर तालुका व शहर यांच्या वतीने शिरुर येथे चर्मकार समाज जागृती मेळावा व वधु वर परिचय नोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चर्मोद्योग व चर्मकार आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे होते.या कार्यक्रमाला चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.शशिकांत सोनवणे,प्रदेश कार्याध्यक्ष शांताराम कारंडे, प्रदेश महिलाध्यक्षा डॉ.मिराताई शिंदे, ग्राहक संरक्षण विभागाचे माजी राज्यमंञी सुर्यकांत गवळी, उद्योगपती प्रकाश धारिवाल, माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे, रविंद्र धनक, बारामती तालुकाध्यक्ष भाउसाहेब कांबळे, पुरंदरचे कार्याध्यक्ष मंगेश गायकवाड,नवनाथ शेवाळे, राजकुमार साळुंखे, पुणे शहराध्यक्ष राजाभाउ पोटे, सुखदेव अबनाळे आदी उपस्थित होते.

यावेळी बाजारसमितीचे सभापती शशिकांत दसगुडे यांनी जागतिकिरणाबरोबर विविध क्षेञात सातत्याने नवनवीन संधी निर्माण होत  असुन नवीन तंञज्ञान अंगिकारुन वेगळ्या वाटा शोधण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.तालुकाध्यक्ष विजेंद्र गद्रे यांनी मनोगत व्यक्त करताना राजकारणात चर्मकार समाजाचे प्रतिनिधित्व समाजकल्याणचे माजी सभापती स्व. हरिभाउ इसवे यांच्यापासुन सुरु झाला असुन तोच वारसा जि.प.सदस्य अंकुश सोणवणे,पं.स.सदस्या प्रतिभा शेलार, घोडगंगेचे संचालक उत्तमराव सोणवणे यांच्या रुपाने पुढे सुरु असल्याचे सांगितले.

या प्रसंगी चर्मकार समाजातील डॉ.उमेश कनकवलीकर(मी विजेता होणारच),डॉ.संतोष पोटे(चिञपट निर्माते),प्रतिभा शेलार(राजकिय),उत्तम सोनवणे(सहकार),मधुकर सातपुते(शिक्षण), अक्षय वेताळ(इस्ञोत निवड),सोनाली पोटे व देवेंद्र वेताळ(विशेष गुणवत्ता) यांचा स्मृतीचिन्ह,शाल देउन सत्कार करण्यात आला.दोन सञात चाललेल्या या कार्यक्रमात राज्यभरातुन आलेल्या २०० विवाहेच्छुकांनी वधु-वर परिचय मेळाव्यात सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राळेगणचे माजी सरपंच विलास पोटे, स्वागत शहराध्यक्ष तुषार अडसुळ, यांनी केले तर सुञसंचालन प्रा.दत्ताञय शिंदे तर आभार पुणे जिल्हा प्रमुख शुभांगी गाडेकर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश जगताप, विशाल पोटे,धनंजय ढवळे,ऋषिकेश कोठवळे, कैलास सातपुते, गोपिचंद कदम,मोहन गद्रे, जगन्नाथ खामकर,तुषार वेताळ,खंडु गंगणे आदींनी घेतले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या