'माजी आमदार अशोक पवार करतात दुटप्पीपणा'

Image may contain: 4 people, child and indoorशिंदोडी,ता.५ एप्रिल २०१८(तेजस फडके) :  भाजपा सरकारने शेतकऱ्यांची व सर्वसामान्य लोकांची घोर निराशा केली असुन शेतकऱ्यांना देण्यात आलेली कर्जमाफीत सुद्धा अनेक चुका आहेत. सरकारच्या विरोधात सर्वसामान्य जनतेत प्रचंड निराशा असुन त्यासाठीच शिरुर येथील हल्लाबोल आंदोलनास शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात प्रतिसाद द्यावा असे आवाहन माजी आमदार अशोक पवार यांनी शिंदोडी (ता. शिरुर) येथे केले.

१० एप्रिल रोजी शिरुर येथे होणाऱ्या हल्लाबोल आंदोलनाच्या नियोजनासाठी शिरुर तालुका राष्ट्रवादीच्या वतीने करडे,निमोणे,गुनाट,चिंचणी,शिंदोडी, मोटेवाडी येथे गावभेट दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते.यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रविबापु काळे,जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सभापती सुजाता पवार,जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे (पाटील),राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कुंडलिक शितोळे, तालुका राष्ट्रवादी सामाजिक व न्याय विभागाचे सरचिटणीस रामकृष्ण गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य एकनाथ वाळुंज,निलेश वाळुंज,विकासोच्या अध्यक्षा कल्पना ओव्हाळ, माजी अध्यक्ष शिवाजी वाळुंज,भगवंत वाळुंज व ग्रामस्थ उपस्थित होते.
                 
शिंदोडी येथील बाबुराव पाचर्णे यांचे कट्टर समर्थक असलेले दौलत खेडकर सध्या पाचर्णे यांची साथ सोडुन अशोक पवार यांच्या संपर्कात आहेत. परंतु शिंदोडी येथील बैठकीत ते उपस्थित नसल्याने माजी आमदार अशोक पवार, सुजाता पवार, रविंद्र काळे, राजेंद्र जगदाळे, यांनी त्याच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यामुळे गावातील राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते नाराज झाले असून माजी आमदार अशोक पवार दुटप्पीपणा करत असल्याची खंत येथील काही कार्यकर्त्यानी व्यक्त केली.त्यावर प्रतिक्रिया देताना दौलत खेडकर म्हणाले,मला कार्यक्रमाला यायला उशीर झाल्याने आमदारांनी माझ्या घरी येऊन भेट घेतली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या