प्लास्टिक बंदीमुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत: कुतवळ

आंधळगाव, ता.५ एप्रिल २०१८(प्रमोल कुसेकर): प्लास्टिक बंदीमुळे दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ व्यवसाय अडचणीत आला आहे,हा उद्योग पुर्णपणे प्लास्टिकशी संबंधित आहे.त्यामुळे दुध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेत पाठपुरावा  केलेला आहे अशी माहीती उर्जा उद्योगसमुहाचे प्रकाश कुतवळ यांनी दिली.

राज्य सरकारने १ एप्रिलपासून संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय मागील आठवड्यात घेतला.अर्धा लिटरपेक्षा कमी साठवण क्षमता असलेल्या बाटल्यामधील उत्पादने आईसस्क्कीम,लस्सी,दही,श्रीखंड,आम्रखंड,फ्लेवर्ड मिल्क तसेच तूप जार यांच्यासाठी प्लास्टिक बाटल्यांना पर्याय नसल्याने दुग्धजन्य पदार्थाची पँकिंग कशामध्ये करावी हा प्रश्न दुग्धजन्य उत्पादकांसमोर  उभा राहिला आहे.संपूर्ण दुग्धजन्य पदार्थ उद्योगाची वितरण व्यवस्था अडचणीत येण्याची शक्यता आहे.यामुळे या क्षेत्राशी संबंधित ३६ प्रकल्पाचे आणि दुध पावडर प्रकल्पाच्या प्रतिनिधीची एक बैठक नुकतीच पुण्यात पार पडली.या बैठकीचे आयोजन दुध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघटनेने केले होते.

प्लास्टिक बंदीच्या राज्य सरकारच्या या निर्णयामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा आढावा घेण्यात आला.दरम्यान पन्नास मायक्राँन जाडीपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यावरील बंदीचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे सर्वांनी मान्य केले.माञ त्यापुढील जाडीच्या प्लास्टिकवर आइसस्क्रिम ,दही,श्रीखंड,लस्सी,आम्रखंड,फ्लेवर्ड मिल्क,पनीर ,बासुंदी,ताक,खवा,पैढा,आदी उत्पादनांचे संपूर्ण पँकीग अवलंबून आहे.त्यामुळे संपूर्ण दुध प्रक्रिया उद्योग आडचणीत येऊ शकतो.याबाबत मुख्यमंञ्यापर्यंत आमचे म्हणणे पाठविल्याची माहीती संघटनेचे सचिव व उर्जा उद्योगसमूहाचे अध्यक्ष प्रकाश कुतवळ यांनी दिली.

या आठवड्यात सहकारी दुध प्रक्रिया उद्योगाची बैठक पुण्यात होत आहे.त्यानंतर दोन्ही ठिकाणच्या प्रमुख पदाधिकार्याच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत  बैठक घेण्यात येणार असल्याचे कुतवळ यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या