शिक्रापूर येथे यात्रा कमिटीच्या अध्यक्षावर गोळीबार

Image may contain: 1 person, sunglasses and closeup
शिक्रापूर
, ता. ५ एप्रिल २०१८ (शेरखान शेख) :
शिक्रापूर येथील यात्रा कमिटीचे अध्यक्ष आणि हॉटेल व्यावसायिक असलेले राजेंद्र करंजे यांच्यावर आज पहाटेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडली.

याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर ता. शिरूर येथील यात्रेचे अध्यक्ष असलेले राजेंद्र करंजे हे बुधवारी यात्रेतील कुस्त्यांचा आखाडा आणि त्यांनतर रात्री तमाशाचा कार्यक्रम होता त्यावेळी करंजे हे यात्रा कमिटीच्या सदस्यांसोबत तमाशा पाहत होते. रात्री अडीचच्या सुमारास करंजे यांना झोप येऊ लागल्याने ते झोपण्यासाठी घरी गेले. घराजवळ गेल्यानंतर ते मनाली हॉटेल समोर दुचाकी उभी करत असताना अचानक दुचाकीवरून तिघेजण आले त्यातील पाठीमागे बसलेल्या एकाने करंजे यांना पिस्तुलमधून गोळी झाडली. ती गोळी करंजे यांच्या मांडीतून आरपार गेली. त्यांनतर लगेच त्याने दुसरी गोळी झाडली ती करंजे यांना लागली नाही त्यांनतर पुन्हा तिसरी गोळी झाडली असता ती गोळी करंजे यांच्या डाव्या हाताला लागली.

यावेळी करंजे यांनी आरडाओरडा केल्याने शेजारील दोघेजण त्याठिकाणी आले असता हल्लेखोरांनी करंजे यांच्या गळ्यातील सोन्याची चैन ओढली व हातातील सोन्याचे कडे काढत असताना त्यांना कडे काढता आले नाही तोपर्यंत शेजारील दोघेजण आल्याने हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले.

घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्या ठिकाणी दोन पुंगळ्या आढळून आहे. आज झालेल्या गोळीबारात राजेंद्र करंजे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वाघोली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

घटनेची माहिती समजल्याने अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. याबाबत राजेंद्र भालचंद्र करंजे (वय ४६)यांनी फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे हे करत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या