कवठे येमाईत मुलानेच केला वडिलांचा खून

शिरुर, ता.५ एप्रिल २०१८ (प्रतिनीधी) : आईला वडीलांकडुन होत असलेली मारहान असहय झाल्याने अखेर मुलानेच वडीलांना मारहान करुन खुन केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील कवठे येमाई (ता. शिरुर) येथे घडली.

या घटनेत दादाभाउ भगवंता  वागदरे (वय. ६५, रा.वागदरेवस्ती, कवठे येमाई, ता.शिरुर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.या प्रकरणी लक्ष्मीबाई दादाभाउ वागदरे(वय.६०) यांनी मुलाविरुद्ध फिर्याद दिली आहे.तर शिरुर पोलीसांनी आरोपी सोमनाथ दादाभाऊ वागदरे (वय.२५) याला ताब्यात घेतले आहे.

याबाबत शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,मयत दादाभाउ वागदरे हे फिर्यादी लक्ष्मीबाई यांना नेहमी मारहान करायचे.त्यामुळे त्यांनी वैतागुन तीन महिन्यांपुर्वी इचकेवाडी येथील भावाकडे राहण्यास गेल्या होत्या.त्याचप्रमाणे फिर्यादी या तीन दिवसांपुर्वी परत नांदण्यासाठी घरी कवठेयेमाई येथे आल्या होत्या.

बुधवार(दि.४) रोजी सकाळी फिर्यादी या चुलत दिराच्या येथे खुरपणीसाठी गेल्या होत्या.सायंकाळी फिर्यादी घरी आल्यानंतर पती दादाभाउ यांनी खुरपणी च्या कारणावरुन लक्ष्मीबाई यांना मारहान करण्यास सुरुवात केली.त्यावेळी भांडणे सोडविण्यासाठी सासुबाई ताराबाई या मध्ये आल्या परंतु त्यांचेही ऐकले नाही.तेव्हा फिर्यादी या पुतण्याच्या घरासमोर गेला.तेव्हा फिर्यादीचे पुतणे यांनी मारहान करत असल्याचे पाहुन फिर्यादीचे भाचे सतीश इचके व दादाभाउ इचके यांना बोलावुन घेतले.

दरम्यान फिर्यादींचा मुलगा सोमनाथ हा आईला मारहान करत असल्याचे पाहुन भांडणे सोडविण्यासाठी आला.त्यावेळी मयत दादाभाऊ यांनी सोमनाथ याला शिविगाळ केली.यावेळी सोमनाथने वडील दादाभाऊ यांना बांबुने मारहान केली.तेव्हा फिर्यादीचे भाचे सतीश इचके व दादाभाउ इचके यांनी सोमनाथ याला समजावुन सांगितले.व फिर्यादीचे भाचे मुलगा रामदास यांनी दादाभाऊ यांना घरासमोर आणुन झोपवले व निघुन गेले.

त्यानंतर राञी ११:३० च्या सुमारास दादाभाउ यांनी मुलगा  सोमनाथ याला पुन्हा शिविगाळ केली.सोमनाथ याने हाच राग मनात धरुन व आईला मारहान केल्याचा राग धरुन वडील दादाभाऊ यांना लोखंडी गजाने मारहान केली.यावेळी फिर्यादी यांनी सोमनाथ यास समजावण्याचा व आवरण्याचा प्रयत्न केला.परंतु तरीही सोमनाथ ने ऐकले नाही.सोमनाथ याने वडील दादाभाऊ हे खाली पडलेले असताना मोठा दगड उचलुन डोक्यात मारला व परत एकदा डोक्यात दगड घालुन खुन केला.

या प्रकरणी शिरुर पोलीसांनी आरोपी सोमनाथ दादाभाऊ वागदरे(वय.२५) याला ताब्यात घेतले.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या