मिलिंद एकबोटे यांना न्यायालयीन कोठडी

Image may contain: 1 person, smiling, hat and closeupशिरुर,ता.७ एप्रिल २०१८(प्रतिनीधी) : कोरेगाव भिमा येथे एक जानेवारी रोजी झालेल्या दंगलीप्रकरणी मिलिंद एकबोटे यांना शिरुर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद रमाकांत एकबोटे यांच्यावर शिक्रापुर पोलीस स्टेशनला विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते.बुधवार(दि.४) रोजी शिरुर न्यायालयात त्यांना हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांना शनिवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

त्यानुसार पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज शिरुर न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे एकबोटे यांना हजर करण्यात आले.यावेळी पोलिसांनी एकबोटे यांच्या कडे तपास करावयाचा असून सात दिवसाची पोलीस कोठडी वाढवून देण्याची न्यायालयाकडे मागणी केली होती.परंतु न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.

मिलिंद एकबोटे यांचे वकिल अॅड.डॉ.चिंतामनी घाटे यांनी बोलताना सांगितले कि,मिलिंद एकबोटे यांच्या जामीनासाठी सोमवार (दि.९)रोजी न्यायालयात अर्ज करणार असल्याचे अॅड.डॉ.चिंतामनी घाटे यांनी  संकेतस्थळ www.shirurtaluka.com शी बोलताना सांगितले.

मिलिंद एकबोटे यांच्यावतीने अॅड.डॉ.चिंतामनी घाटे, अॅड.सुयोग वाघ,अॅड.सुहास ढमढेरे यांनी काम पाहिले.तर सरकारी वकिल म्हणुन व्ही.आर.राउत यांनी काम पाहिले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या