रांजणगाव सांडसची तरुणाई उतरलीय रस्त्यावर... (Vdo)

रांजणगाव सांडस, ता.१४ एप्रिल २०१८(प्रतिनीधी) : रांजणगाव सांडसचे युवक नेहमी विधायक उपक्रम राबवत असतात.याचाच एक भाग म्हणुन आज (दि.१४) रोजी येथील भल्या पहाटे रस्त्यावर येउन अनोखा उपक्रम राबवत आहेत.

रांजणगाव सांडस तसं शिरुर तालुक्यातील छोटसं गाव. परंतु या गावातील युवक हे नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. याच उपक्रमाच्या माध्यमातुन तरुणांनी गावात वेगळा पायंडा पाडण्याचे काम केले आहे. आज (शनिवार) 14 एप्रिल रोजी भल्या पहाटे गावचे काही युवक रस्त्यावर उतरले असुन गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गावात स्वच्छता मोहिम राबवत आहेत. यात विशेष म्हणजे युवकांच्या उपक्रमांना साथ देण्यासाठी गावचे उपसरपंच राहुल रणदिवे, तुकाराम पठारे, पैलवान उमेश रणदिवे, तुषार जगताप, स्वप्निल भोसले, अनिकेत पाटोळे, स्वप्निल साहेबराव भोसले, प्रदिप भोसले, गजानन लवांडे, प्रदिप भोसले, विकास पाटोळे, सिद्धार्थ गायकवाड, युवराज वाडकर आदींनी या उपक्रमात सहभाग घेतला.

या सर्व युवकांनी कोणतीही लाज न वाटता हातात झाडू घेउन गावातील मुख्य चौकाचौकात ग्रामस्वच्छतेचे काम केले आहे. यापुर्वीही अशाच पद्धतीने या युवकांनी उपक्रमाला ग्रामस्थांसह अनेकांनी कौतुक केले आहे. या बाबत  उपसरपंच  राहुल रणदिवे यांनी बोलताना सांगितले कि, स्वच्छता करण्यात लाज न बाळगता काम करणे हा अनुभव खुप आनंददायी असून समाजासाठी प्रेरणादायी आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या