कर्डेलवाडीच्या अस्थितज्ञाच्या अपघाताने तालुक्यात हळहळ

Image may contain: 1 person, closeup and outdoorशिरुर, ता.१५ एप्रिल २०१८ (प्रतिनीधी)  :  शिरुर तालुक्यातच नव्हे तर संपुर्ण जिल्हयात हाडांच्या उपचारपद्धतीसाठी प्रसिद्ध असणा-या कर्डेलवाडीच्या अस्थितज्ञाचा अपघाती मृत्यु झाल्याने शिरुर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

चारचाकी वाहनाने धडक देउन झालेल्या अपघातात कर्डेलवाडी (ता.शिरुर) कारभारी महादु कर्डिले (वय.५६) यांचा मृत्यु झाला तर एक जखमी झाला आहे.

शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार (दि.१४) रोजी शनिवारचा आठवडे बाजार शिरुर ला असतो. या बाजारासाठी फिर्यादी व त्यांचे चुलते कारभारी कर्डिले हे शेजा-यांची लुना मोपेड एम.एच.१२ के.एक्स ७४५३ हि घेउन शिरुर येथे आले होते. बाजार करुन पुन्हा घरी जात असताना पाषानमळा शिरुर येथून संग्राम हॉटेल समोरुन जात असताना सकाळी साडेअकराच्या सुमारास यांच्या लुना मोपेड या दुचाकीस मागून येणा-या ह्युंदाई अॅसेट एम.एच.१२.एन.बी.५०४५ या चारचाकी वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली.

धडक दिल्यानंतर गाडीवरील दोघे जण जोरात रस्त्यावर पडले. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेउन फिर्यादीस व गंभीर जखमी अवस्थेतील दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. या अपघातात फिर्यादीस किरकोळ मार लागला. तर कारभारी कर्डिले यांच्या डोक्याला, उजव्या हाताला व तोंडाला मार लागला होता. उपचारादरम्यान डॉक्टरांनी कारभारी कर्डिले यांचा मृत्यू झाल्याचे निदान केले.

कारभारी कर्डिले हे शिरुर तालुक्यात हाडवैद्य म्हणुन प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक व्यक्तींवर गंभीर हाडांच्या दुखापतींवर गेल्या अनेक वर्षांपासून उपचार करत होते. त्यांच्या जाण्याने शिरुर शहर, शिरुर तालुक्यात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. या संदर्भात विक्रम शंकर कर्डिले (वय.३४, रा. कर्डेलवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

अपघाताला कारणीभुत ठरल्याप्रकरणी घनश्याम दत्ताञय गुंड (वय २२, रा.येळपणे, ता. श्रीगोंदा) या चारचाकी वाहन चालकावर गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशनचे वैभव मोरे हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या