इनामगावची सिद्धेश्वर महाराजांची याञा उद्या

इनामगाव,ता.२२ एप्रिल २०१८(प्रतिनीधी) : इनामगाव(ता.शिरुर) येथील ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांची याञा सोमवार(दि.२३) व मंगळवार (दि.२४) रोजी होनार असल्याची माहिती उपसरपंच शिवाजी मचाले यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले कि, इमानगाव चे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या याञेनिमित्त सोमवार(दि.२३) रोजी पहाटे श्रींचा अभिषेक घातला जाणार असुन दिवसभर मुक्त दर्शन घेता येणार आहे.सायंकाळी आंबिल,शेरणी वाटप व नवस फेडण्याचा कार्यक्रम होइल.राञी दारुगोळ्याची आतषबाजी केली जाणार असुन छबिना मिरवणुक निघणार आहे.त्यानंतर प्रसिद्ध रघुवीर खेडकर यांचा लोकनाट्याचा तमाशा होणारा आहे.

मंगळवार(दि.२४) रोजी सकाळी हजे-यांचा कार्यक्रम होणार असुन दुपारी चारनंतर निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा होणार असुन वजनगटावर कुस्त्या खेळविल्या जाणार आहे.राज्यभरात निकाली कुस्त्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या आखाड्यात सहभाग घेण्यासाठी मल्लांनी सकाळी नावनोंदणी व वजने नोंदविणे आवश्यक असल्याचे सांगितले.राञी पुन्हा लोकनाट्याचा कार्यक्रम होणार असुन याञाकाळात गैरसोय होउ म्हणुन सरपंच मंगलताई म्हस्के यांसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, याञा कमिटीने चांगले नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या