शिरुरजवळ बो-हाडेमळ्यात आढळला अनोळखी मृतदेह

No automatic alt text available.
शिरुर
, ता. २२ एप्रिल २०१८ (प्रतिनीधी) :
बो-हाडेमळा (ता.शिरुर) येथील शेतजमिनीत अनोळख्या व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला असून, या प्रकरणी कृष्णा रघुनाथ बो-हाडे (वय. ३५) यांनी शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.

शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बो-हाडे हे बो-हाडेमळा येथे राहण्यास असुन ते प्रकाश झुंबरलाल बोरा यांची शेतजमीन ते साधारणपणे ६ वर्षांपासुन खंडाने करत आहेत.याच जमीनीशेजारी कोठारी(संपुर्ण नाव माहिती नाही) यांची जमीन आहे. या दोन जमिनींच्या मध्ये बांधाचा पाट आहे. शनिवार (दि.२१) रोजी सकाळी फिर्यादीचे बंधु कैलास बो-हाडे  यांना दोन जमीनींच्या मधील बांध्याच्या पाटात अनोळखी इसम मयतावस्थेत असल्याचे दिसुन आले. त्यांनी तत्काळ फिर्यादीस हि माहिती दिली.यावेळी त्यांनी जाउन पाहिले असता, बांधाच्या पाटाच्या झुडुपांच्या सावलीत एक काळे रंगाचा अनोळखी इसम उतानेवस्थेत निपचित पडल्याची दिसली.

मयत व्यक्तीच्या अंगात निळया रंगाचा टी-शर्ट, चेक्सचा बर्मुडा, वय अंदाजे ४५ वर्ष, उंची साधारणपणे ५फुट ३ इंच असुन मयत व्यक्तीची बॉडी पुर्णपणे सडलेली आहे. घटनेची माहिती कळताच शिरुर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेउन पंचनामा केला आहे. या घटनेचा प्राथमिक तपास उमेश भगत यांनी केला असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या