विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीने गावासाठी राबविला ऊर्जा प्रकल्प

Image may contain: 5 people, outdoorविठ्ठलवाडी, ता. 23 एप्रिल 2018 (एन. बी. मुल्ला): श्री क्षेत्र विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीने अपारंपारिक ऊर्जा निर्मिती करून वर्षाला ५ हजार ४०० यूनिट विजेची निर्मिती करून सुमारे ४३ हजार २०० दोनशे रुपयांची बचत केली आहे.

श्री क्षेत्र विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीने गट विकास आधिकारी संदीप जठार व शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकांच्या  मार्गदर्शनाखाली विजेची बचत म्हणजे विज निर्मिती हे ध्येय उराशी बाळगून विठ्ठलवाडीच्या ग्रामस्थांनी विज जपून वापरण्याचा संकल्प केला आहे. याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायतीने वीज बचतीसाठी अपारंपारिक ऊर्जास्त्रोत निर्मिती करून वर्षाला ५ हजार ४०० युनिटची वीज तयार करून सुमारे ४३ हजार २०० एवढ्या किंमतीच्या विजेची बचत केली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर पारंपरिक ऊर्जा स्त्रोताची बचत होणार आहे. शिरूर तालुक्यात पहिलाच अपारंपरिक ऊर्जेचा हा प्रकल्प सरपंच ललिता गाडे, उपसरपंच बाबाजी गवारे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या रकमेतून राबवला आहे.
ग्रामपंचायतीच्या सौरऊर्जेच्या प्रकल्पासाठी साधारण 1 लाख 2 हजार रुपये खर्च झाले आहेत तसेच 4 अंगणवाड्यांसाठी एक लाख रुपये खर्च करून सौर ऊर्जा निर्मिती केल्याने विठ्ठलवाडी, महानुभावमळा, वेगरे पुनर्वसन, भोसेवस्ती या चार ठिकाणच्या विजेपासून वंचित असणाऱ्या अंगणवाड्यांमध्ये हा प्रकल्प बसवल्याने प्रथमच या अंगणवाड्या उजळल्या आहेत. विशेषतः या सर्व अंगणवाड्या विज सुविधेपासून पूर्णता वंचित होत्या. एका अंगणवाडीसाठी प्रतिदिवशी १ यूनिट तर ग्रामपंचायतीसाठी ५ युनिट विजेची निर्मिती होत आहे. त्याचबरोबर या ग्रामपंचायतीने नुकताच ग्रामपंचायतीच्या १५ टक्के रकमेतून दलित वस्तीसाठी ७५० लिटरचा सोलर वॉटर हिटर बसवून १० कुटुंबांसाठी गरम पाणी उपलब्ध करून दिल्याने या दलित वस्तीमधील नागरिक आनंदी दिसत आहेत.

विठ्ठलवाडी गावामध्ये ठीक ठिकाणी सौर पथदिवे, घराघरात एलईडी दिव्यांचा वापर करून मोठ्या प्रमाणात विजेची बचत केलेली आहे. अपारंपारिक ऊर्जा प्रकल्प राबवण्यासाठी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अलका राऊत, माजी उपसरपंच दिलीप गवारे, राजेंद्र शिंदे ग्रामपंचायत सदस्य जयेश शिंदे, तानाजी मारणे, कौशल्या हंबीर, सुजाता शेलार, प्रियंका पवार व  ग्रामसेवक दादासाहेब नाथ यांनी विशेष परिश्रम घेतले. सोनू रियल सोलर कंपनीच्या माध्यमातून चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून गणेश बाळासो गवारे यांनी हे सौर ऊर्जा प्रकल्प उभे केले आहेत.

शिरूर तालुक्यात विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीने पहिलाच नाविन्यपूर्ण असा अपारंपारिक ऊर्जा प्रकल्प केला असून इतर ग्रामपंचायतींनी याचा आदर्श घेऊन सौर ऊर्जा प्रकल्प राबविल्यास विज बचत होऊन मोठ्या प्रमाणात विजेची निर्मिती होईल.                                             
- संदीप जठार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, शिरूर   

ग्रामपंचायतीमध्ये अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत निर्माण केल्याने संगणक, प्रिंटर, पंखे व इतर उपकरणे इथून पुढे विनाखर्चिक अखंडितपणे चालू राहणार असल्याने ग्रामपंचायतीला विजेचे बिल भरावे लागणार नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीची आर्थिक बचत होणार आहे.
- सरपंच, विठ्ठलवाडी

पारंपरिक ऊर्जेचा विजेची बचत करण्याच्या दृष्टीने विठ्ठलवाडी गावांमध्ये १०० कुटुंबाने सोलर वॉटर हिटर बसवल्यामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबला आहे. भविष्यामध्ये अपारंपरिक ऊर्जा संदर्भात विविध प्रकल्प राबवण्याचा संकल्प आहे.
- उपसरपंच, विठ्ठलवाडी

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या