प्रदिप कंद यांना आमदार म्हणून शिरूरकरांची पसंती

Image may contain: 1 person, smiling
शिरूर, ता. 23 एप्रिल 2048:
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद यांना आमदार म्हणून शिरूरकरांनी मतचाचणीद्वारी पसंती दिली आहे.

शिरूर तालुक्यात आघाडीवर असलेल्या www.shirurtaluka.com ने खालीलप्रमाणे मतचाचणी घेतली होती. नेटिझन्सने आपले मत नोंदविताना कंद यांना आमदार म्हणून पहायला आवडेल असा कौल दिला आहे.

मतचाचणी व निकाल पुढीलप्रमाणेः
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद यांना तुम्ही काय म्हणून पसंती द्याल ?
आमदार- 59 टक्के
खासदार- 35 टक्के
वरील पैकी एकही नाही- 6 टक्के


शिरूर तालुक्यातून राष्ट्रवादी कोणाला तिकीट कोणाला देणार व कोणाचे तुल्यबळ ठरणार हे काळच ठरविणार असले तरी नेटिझन्सनी कंद यांना आमदार म्हणून पसंती दिली आहे. शिरूर तालुक्यातून आमदारकी लढविण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही अनेक उमेदवार उत्सुक असून, काहींनी तयारीही सुरू केली आहे. मात्र, पक्ष कोणाला तिकीट देणार? यावरूनच पुढील राजकारण ठरणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या