गोलेगावात चोरट्यांकडून ६ लाखांचा ऐवज लंपास

No automatic alt text available.गोलेगाव, ता. २४ एप्रिल २०१८(प्रतिनीधी) : गोलेगाव (ता.शिरुर) येथील कानिफनाथ वस्ती येथे सुमारे ६ लाख ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली.

या प्रकरणी सचिन प्रदिप वाखारे यांनी शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आली आहे.फिर्यादी सचिन वाखारे हे फोटोग्राफीचा व्यवसाय करत असुन (दि.२२) रोजी दिवसभर शिरुर नगरपालिकेत फोटोग्राफीचे काम केले.राञी घरी गेल्यानंतर अकरा वाजेपर्यंत टिव्ही पाहिला व त्यानंतर ते झोपी गेले.(ता.२३) रोजी सकाळी साडेसहा वाजता  फिर्यादीच्या पत्नी या उठल्या व किचनच्या खोलीत गेल्या असता किचनच्या खोलीची मागील खिडकीचे गज कशाने तरी कट  करुन घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले.यावेळी फिर्यादी यांनी खोलीची पाहणी केली असता किचन खोलीतील लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम कपाटाशेजारील ड्रोन कॅमेरा  चोरीस गेल्याचे लक्षात आले.

या चोरीत १ लाख ५० हजारांचे सहा तोळे वजनाचे सोन्याचे गंठण,२५ हजार रुपये किंमतीचे अर्धा तोळा वजनाचे दोन अक्कासाहेब डोरले, ५० हजार रुपये किंमतीच्या दोन तोळे वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, कानातील कर्नफुले व दीशड तोळे वजनाचे सोन्याचे बदामाची आकाराची कर्णफुले अंदाजे ३७ हजार ५०० किंमतीचे, ३८ हजार रुपये किंमतीच्या दोन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या  आठ लहान अंगठ्या, रोख दोन लाख रुपये, १ लाख रुपये किंमतीचा ड्रोन कॅमेरा असा मिळुन ६ लाख ५०० रुपयांचा ऐवज चोरी केला आहे.या प्रकरणी शिरुर पोलीसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भिमगोंडा पाटील हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या