चितपट कुस्त्यांनी गाजला इनामगावचा आखाडा

Image may contain: one or more people, crowd, basketball court, stadium and outdoorइनामगाव, ता. २५ एप्रिल २०१८ (प्रतिनीधी) : राज्यभर चितपट कुस्त्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या इनामगाव(ता.शिरुर) येथील आखाडयात मल्लांनी केलेल्या नेञदिपक खेळांनी कुस्ती शौकिनांच्या डोळयाचे पारणे फेडले.
Image may contain: 2 people, crowd and outdoor
इनामगाव(ता.शिरुर) येथे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या याञेनिमित्त कुस्तीच्या आखाडयाचे नियोजन करण्यात आले होते. या आखाडयात शिरुर,श्रीगोंदा,दौंड,नगर,पुणे,कोल्हापुर आदी ठिकाणांहुन सुमारे ३०० च्यावर मल्लांनी सहभाग घेतला होता.यावेळी मल्लांनी कुस्त्या चितपट करत कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडले.यावेळी ग्रामस्थांकडुन रोख बक्षिसे देण्यात आली.

इमानगाव चे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या याञेनिमित्त सोमवार(दि.२३) रोजी पहाटे श्रींचा अभिषेक घातला व त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. दिवसभर अनेकांनी मुक्त दर्शनाचा लाभ घेतला.सायंकाळी आंबिल,शेरणी वाटप व नवस फेडण्याचा कार्यक्रम झाला तर दारुगोळ्याची आतषबाजी व छबिना मिरवणुक काढण्यात आली.त्यानंतर प्रसिद्ध रघुवीर खेडकर यांचा लोकनाट्याचा तमाशाचा कार्यक्रम पार पडला.मंगळवार(दि.२४) रोजी सकाळी हजे-यांचा व  राञी पुन्हा लोकनाट्याचा कार्यक्रम शांततेत पार पडला.असुन याञाकाळात गैरसोय होउ म्हणुन सरपंच मंगलताई म्हस्के,उपसरपंच शिवाजी मचाले यांसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, याञा कमिटीने चांगले नियोजन केले होते.मंदिरावर विद्युत रोशनाई केल्याने मंदिर परिसर फुलुन गेला होता.तर ग्रामस्थांच्या वतीने शुद्ध पाण्याची भाविकांना व्यवस्था करण्यात आली होती.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या