टोमॅटो चे भाव गडगडल्याने शेतकरी अडचणीत

आंधळगाव, ता. २५ एप्रिल २०१८ (प्रमोल कुसेकर): दरवर्षी एप्रिल ते मे या कालावधीत पालेभाज्यांना चांगला भाव मिळत असल्याचा अनुभव आहे, पण यंदा एप्रिल सरत आला तरी समाधानकारक भाव नसल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. उत्पन्नावर आधारित हमी भाव केवळ भाषणातच ऐकायला मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठी गुंतवणूक करूनही उत्पादन खर्च निघत नाही.

जिल्हाभरात मागील पावसाळ्यात दमदार पाऊस झाल्याने विहिरी व इतर जलस्त्रोताच्यामाध्यमातून बहुतेक ठिकाणी शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध आहे. या जोरावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांचे उत्पादन घेण्यावर भर दिला. पण पालेभाज्यांचे दर कोसळलेलेच आहेत. टोमॅटो विकावे की फेकावेत असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे.

टोमॅटो मागील वर्षी वीस ते तीस रुपये किलोने विकला गेला होता. यंदा मात्र, बाजार समितीत टोमॅटोला पन्नास पैसे ते दोन रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. शेती मशागतीसह प्रत्यक्ष बाजार समितीपर्यंत शेतमाल वाहून आणण्यास प्रतिकिलो एक ते दीड रुपया खर्च येतो. पण बाजारभावच दीड ते दोन रुपये मिळत असल्याने शेतकऱ्यांना नफा तर दूरच पण तोटा सहन करावा लागत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या