शिरूर तालुक्यात ग्रामंपचातीच्या रणधुमाळीला सुरवात

Image may contain: text
शिरूर, ता. 26 एप्रिल 2018 (
सतीश केदारी): शिरूर तालुक्यातील आण्णापूर, शिरूर ग्रामीण, सरदवाडी, कर्डेलवाडी, तार्डोबाची वाडी, वाजेवाडी या सहा गावांमधील ग्रामंपचातीच्या रणधुमाळीला सुरवात झाली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जून ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित झालेल्या; तसेच रिक्त जागा असणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुरूप सोमवारी (ता.23) मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू करण्यात आली. रविवारी (ता. 27 मे) मतदान प्रक्रिया होणार आहे. निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनुरूप थेट सरपंच पदासह सदस्य पदासाठीच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा फड रंगणार आहे.

शिरूर तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या तसेच शिरूर  शहरासाठी महत्वच्या असणाऱ्या शिरूर पंचक्रोशीतील पाच ग्रामपंचायातीसह सहा ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून खर्या अर्थाने या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय रणधुमाळीला सुरवात झाली असून तालुक्याचे आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या समर्थकांमध्ये व राष्ट्रवादीच्या समर्थकांमध्ये सरळ लढत पाहवयास मिळणार आहे.

अण्णापूर,कर्डेलवाडी,तर्डोबाचीवाडी,सरदवाडी,शिरूर ग्रामीण,या पंचक्रोशीतील पाच ग्रामपंचायातीसह तालुक्यातील वाजेवाडी येथे निवडणूक पार पडत आहे.सध्या शिरूर पंचक्रोशीतील सर्वच ग्रामपंचायतींवर आमदार पाचर्णे यांचे वर्चस्व आहे.त्यामुळे या निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.दिनांक ७ मे ते १२ मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.१४ मे रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे.१६ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघे घेण्याची मुदत आहे.२७ मे रोजी मतदान होणार असून २८ मे रोजी शिरूर तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.या वेळी शिरूर ग्रामीण सरपंच पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग या साठी राखीव असून तर्डोबाचीवाडी सरपंच पदासाठी सर्वसाधारण महिला या साठी राखीव आहे.अण्णापूर सरपंच पदासाठी सर्वसाधारण साठी राखीव असून सरदवाडी सरपंच पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग या साठी राखीव आहे कर्डेलवाडी या सरपंच पद्साठी सर्वसाधरण पदासाठी राखीव असून वाजेवाडी सरपंचपदासाठी सर्वसाधरण पदासाठी राखीव आहे.या सर्व भागात आचारसंहिता लागू झाली आहे.

विधानसभा व लोकसभेपूर्वी होत असलेल्या आण्णापूर, शिरूर ग्रामीण, सरदवाडी, कर्डेलवाडी, तार्डोबाची वाडी, वाजेवाडी या सहा गावांमध्ये होणाऱया निवडणूकांकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. तालुक्यातील राजकीय नेत्यांनीही या गावांमध्ये लक्ष घालण्यास सुरवात केली आहे. इच्छुक उमेदवार सोशल नेटवर्किंगचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसत आहे. यामुळे या निवडणूकीचा प्रचार सोशल मिडीयावरून होणार आहे.

कालावधी पुढीलप्रमाणेः

  • नामनिर्देशनपत्रे स्वीकारले जाणार: 7 ते 12 मे 2018 या कालावधीत
  • छाननी: 14 मे 2018 रोजी
  • नामनिर्देशनपत्रे मागे घेता येणार: 16 मे 2018 पर्यंत
  • चिन्ह वाटप: 16 मे 2018 रोजी
  • मतदान: 27 मे 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल.
  • मतमोजणी: 28 मे 2018 रोजी.

अधिक माहितीसाठीः
सतीश केदारीः 8805045495

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या